शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर!, अंगणवाडी सेविकांना ७ दिवस दिवाळी सुट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:52 IST

शासनाचे परिपत्रक मागे : मानधनासोबत कामाचे तासही वाढले

कोल्हापूर : अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन टप्प्यांत दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर बुधवारी हा निर्णय शासनाने मागे घेतला. आता अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे.अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर तर मदतनीस यांना ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी मंजूर केल्याचा आदेश मंगळवारी काढला. मात्र, याला अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून तीव्र विरोध झाला. तसे पत्र संघटनेने एकात्मिक बालविकास सेवायोजनेचे आयुक्त कैलास पगार यांना पाठवले. त्यानंतर बुधवारी शासनाने हा आदेश मागे घेतला.

वेळ पाचपर्यंत वाढवली..शासनाने या महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वाढवले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजारांवरून १३ व सेवाज्येष्ठता वाढ, मदतनिसांचे मानधन ५ हजारांवरून ७५०० व सेवाज्येष्ठता वाढ असे करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबरीने त्यांच्या वेळेत २ तासांनी वाढ केली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी त्यांची वेळ असेल. त्यातील दोन तास हे गृहभेटीचे असणार आहेत.

सुट्टीत मुले शाळेत कशी येतील?दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले शाळेत येत नाहीत. शाळेचा पोषण आहार खातील की घरचे सणासुदीचे जेवण, फराळ खातील? शिवाय ते पालकांसोबत आजोळी, परगावी जातात. त्यामुळे या कालावधीत अंगणवाडी सुरू ठेवण्यात काही अर्थ नव्हता. ही बाब संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने निर्णय मागे घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी 2024