शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच औद्योगिक वसाहतींत ६६ भूखंड रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:25 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील विविध पाच औद्योगिक वसाहतींमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीचे एकूण ६६ भूखंड सध्या रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त भूखंड हे कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आहेत. पाच वर्षांच्या विहीत मुदतीमध्ये जिल्ह्यातील ज्या उद्योजक-व्यावसायिकांनी भूखंड विकसित केले नाहीत, त्यांच्याकडून ४४ भूखंड महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यातील विविध पाच औद्योगिक वसाहतींमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीचे एकूण ६६ भूखंड सध्या रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक रिक्त भूखंड हे कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आहेत. पाच वर्षांच्या विहीत मुदतीमध्ये जिल्ह्यातील ज्या उद्योजक-व्यावसायिकांनी भूखंड विकसित केले नाहीत, त्यांच्याकडून ४४ भूखंड महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कोल्हापूर विभागाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतले आहेत.शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित, आजरा, हलकर्णी, गडहिंग्लज या औद्योगिक वसाहतींमधील व्यावसायिक वापरासाठीचे ३५ आणि औद्योगिक वापराकरिता असणारे ३१ भूखंड रिक्त आहेत. उद्योग-व्यवसायाकरिता औद्योगिक वसाहतीतील भूखंड ताब्यात घेतल्यानंतर तो विकसित करण्याची मुदत पाच वर्षांची असते.या मुदतीमध्ये भूखंड विकसित झाला नाही, तर ‘एमआयडीसी’ पुन्हा आपल्या ताब्यात घेते. कोल्हापूर जिल्ह्यतील असे ४४ भूखंड आणि गडहिंग्लज औद्योगिक क्षेत्रातील १०१ हेक्टर जागा एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. रिक्त भूखंडाचे वाटप एमआयडीसीकडून ई-बिडिंग (लिलाव) पद्धतीने केले जाते.दर महिन्याला ही प्रक्रिया राबविण्यात येते. यासाठी अर्ज करण्यासह सर्व प्रक्रिया आॅनलाईन आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये ज्यांना नवीन उद्योग अथवा सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांचा विस्तारासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. त्यांना ई-बिडिंगद्वारे भूखंड मिळविणे शक्य आहे.इफेक्टिव्ह स्टेप असेल तरच मुदतवाढनकाशा मंजुरीनंतर बांधकाम करून त्याच्या पूर्णत्वाचा दाखला मिळविणे, त्यानंतर उत्पादन प्रक्रियेकडे जाणे या प्रक्रियेचा भूखंड विकासामध्ये समावेश होता. पाच वर्षांच्या मुदतीत संबंधित भूखंडावरील प्रकल्पाचा नकाशा मंजूर असेल आणि तेथे इमारतीचे काही बांधकाम झाले असल्यास ‘इफेक्टिव्ह स्टेप’ म्हणून भूखंडाचा विकास करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाते, असे प्रादेशिक अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.गडहिंग्लजमधील १०१ हेक्टरचा भूखंड ताब्यातकोल्हापूर जिल्'ातील औद्योगिक वसाहती ‘ड’ आणि ‘ड प्लस’ विभागात आहेत. पाच औद्योगिक वसाहतींमध्ये स्पष्टपणे रिक्त असलेल्या भूखंडांची संख्या ६६ इतकी आहे. विहीत मुदतीमध्ये विकसित झालेले नसलेले ४४ भूखंड ताब्यात घेतले आहेत. त्यांची माहिती ई-बिडिंगसाठी मुख्यालयाला पाठवल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, गडहिंग्लज औद्योगिक क्षेत्रातील १०१ हेक्टरचा भूखंड एका कंपनीला दिला होता. या कंपनीकडून तो विहीत मुदतीमध्ये विकसित झाला नसल्याने हा भूखंड पुन्हा ‘एमआयडीसी’ने ताब्यात घेतला. त्याठिकाणी पायाभूत सुविधांची पूर्तता झाल्यानंतर विविध आकारांमध्ये या भूखंडाची विभागणी करून ते लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.