शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

६४ वर्षीय मारुती पाटील यांची सायकलने पंढरपूर वारी

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

आजच्या तरुणाईला व्यायाम आणि शरीर तंदुरुस्तीचा जणू वस्तूपाठच घालून देणारा आहे.

म्हाकवे : आजच्या विज्ञानयुगात प्रवासाच्या सर्व सेवासुविधा उपलब्ध असतानाही हदनाळ (ता. चिक्कोडी) येथील मारुती विष्णू पाटील यांनी वयाच्या ६४व्या वर्षीही तब्बल सव्वादोनशे कि. मी. अंतर सायकलने पार करून पंढरपूरची १४वी चैत्रवारी केली. ताशी १५ कि. मी. अंतर पार करून १७ तासांच्या प्रवासानंतर ते पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला हजर होतात. निपाणी, मुरगूड, कागल, कोल्हापुरातील आपल्या व्यक्तिगत कामासाठी ते सायकलनेच प्रवास करतात. त्यांचा हा नित्यक्रम आजच्या तरुणाईला व्यायाम आणि शरीर तंदुरुस्तीचा जणू वस्तूपाठच घालून देणारा आहे. सध्या मोटारसायकलसह आलिशान गाड्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चालणे, फिरण्यासह सायकलनेही प्रवास करणे बंद होत चालले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसह ऊसतोड करणाऱ्यांच्या मुलाकडेही मोटारसायकल दिसते. परंतु, मारुती पाटील यांनी सायकलनेच प्रवास करण्याचा जोपासलेला छंद उतार वयातही कायम ठेवला आहे. ते आपल्या पै-पाहुण्यांकडे, नातेवाइकांकडे अथवा निपाणी, मुरगूड, कागल, कोल्हापूर येथील कामेही सायकलनेच जाऊन करतात. दरम्यान, व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या पाटील यांनी शेतीही अत्यंत चिकित्सकपणे केली आहे. दोन एकरामध्ये कुटुंबाला आवश्यक सर्व धान्य उत्पादित केले जाते. (वार्ताहर)सायकलने प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन घेतल्याने मला आत्मिक समाधान मिळते. तसेच आजच्या महागाईच्या काळात प्रवासाचा वाढता खर्च न पेलणारा आहे. सायकलीला मी धनलक्ष्मीच मानत असून, शेवटच्या क्षणापर्यंत सायकलनेच प्रवास करण्याचा निर्धार केला आहे.- मारुती पाटील, हदनाळ, ता. चिकोडी.