शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 14:45 IST

 कोल्हापुर जिल्ह्यात ४३९ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळ पासूनच आपापल्या मतदान केंद्रावर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढत आहे. दुपारपर्यंत ६0 टक्के मतदान झाल्याचे समजते.

ठळक मुद्दे काही मतदान केंद्रावर किरकोळ वादावादी मतदान केंद्रावर महिला, युवकांच्या रांगामतदानाचा वेग वाढत आहेपश्चिम महाराष्ट्रात भाजपची धोबीपछाड होणार : सतेज पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल  : सतेज पाटील

कोल्हापूर , दि. १६ : कोल्हापुर जिल्ह्यात ४३९ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळ पासूनच आपापल्या मतदान केंद्रावर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढत आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरवडे, कोलोली आणि कोतोली येथे किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित बहुतांशी मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु असून ग्रामीण भागात महिला आणि युवकांनी रांगा लावून मतदान केले. दुपारपर्यंत ६0 टक्के मतदान झाल्याचे समजते.

उजळाईवाडी येथील मतदान केंद्रावर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी ग्रामविकास राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्नी प्रतिमा पाटील यांच्यासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ येथे मतदानाचा हक्क बजावला. चिमगाव येथील मतदान केंद्रावर शिवसेना सह संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी मतदान केले.

पाचगाव, गांधीनगर, उचगाव येथे दुपारपर्र्यत सरासरी ७0 टक्क्याहून अधिक मतदान झाले. पावसामुळे बहुतेक गावांमध्ये कापणी, मळणी आदी शेतीची कामे सुरू आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले आहे. त्यामुळे दुपारपर्र्यत मतदानाचा वेग वाढत आहे. लोकांनी गर्दी केली आहे. गोकूळशिरगाव मध्ये सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. सरनोबत वाडीत ५० टक्के तर उचगाव मध्ये ६७ टक्के मतदान झाले. उजळाईवाडीत दुपारी बारा पर्यत चुरशीने ५0 टक्के मतदान झाले. नेर्लीत चुरशीने मतदान झाले. सकाळी साडे अकरापर्यंत येथील केंद्रावर ५0 टक्के मतदान झाले. पाचगाव येथे ४0 टक्के मतदान झाले. कणेरी वाडीत दोन वाजेपर्यंत शांततेत ७३ टक्के मतदान झाले.

राधानगरी तालुक्यात शांततेत मतदान सुरू असून ५0 टक्के मतदान झाले आहे. गडहिंग्लज तालुक्यात ४५ टक्के तर भुदरगड तालुक्यात ३७ ग्रामपंचायतीसाठी आत्तापर्यंत ५५ टक्के मतदान झाले आहे. आमजाई व्हरवडे येथे दुपारी ११.30 वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले आहे.पन्हाळा तालुक्यातील कोतोली तसेच कोलोली या मोठ्या गावांच्यामध्ये सकाळच्या वेळची किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. ती वगळता शांततेत मतदान झाले. सरासरी ७0 टक्क्याच्या जवळपास मतदान झाले. कोतोली केंद्रात मोठी चुरस असल्याने येथील मतदान केंद्रावर वारंवार वादावादी होत होती. कोलोली मतदान केंद्रावरही मोठ्या रांगा लागल्या होत्या. या केंद्रावर चुरशीने ५0 टक्क्याहून अधिक मतदान झाले. माले मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी मोठी गर्दी होती. दुपारपर्यंत या केंद्रावर २५ टक्के मतदान झाले. करंजफेण केंद्रावर चुरशीने ८० टक्के मतदान झाले.करवीर तालुक्यातील नंदवाळ मतदान केंद्रावर दुपारपर्यंत ५५ टक्के तर शेळके वाडी ६५ टक्के मतदान झाले. खामकरवाडी मतदान केंद्रावरील मात्र दुपारपर्यंत फारसे मतदान झाले नाही. मतदार नसल्याने उमेदवार, प्रतिनिधीसह पोलीस कर्मचाºयांनी दुपारी डुलकीचा आस्वाद घेतला.

कांडगाव ग्रामपंचायतीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले. राशिवडे येथे दुपारी एक पर्यंत साठ टक्के मतदान झाले. परिसरातील सर्व सहा मतदान केंद्रावर सकाळपासुन रांगा लागल्या होत्या, येथे मतदान शांततेत आणि अत्यंत चुरशीने सुरू आहे. इव्हिएम मशीनमुळे मतदानाला वेळ लागत आहे. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे ६0 टक्के मतदान झाले. हे गाव मतदान आणि निकालासाठी संवेदनशील मानले जाते.

आंबवडे येथे मतदानासाठी महीलांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील जाखले, आंबवडे येथे दुपारपर्यंत ५0 टक्के मतदान पुर्ण झाले. पिंपळेसातवे पन्हाळा येथे तर सकाळीच ९० टक्के मतदान पुर्ण झाले. दुपारी १ वाजेपर्र्यत जुने पारगावात ५८ टक्के तर नवे पारगावात ६१ टक्के मतदान झाले. शाहुवाडी तालुक्यातही उत्साहाने मतदानास सुरुवात झाली. घुंगूर ता. शाहूवाडी येथील १0३ वर्षाच्या चंद्राबाई रामू खोत या आजीला त्यांचा नातू जोतीराम खोत याने पाठीवरुन नेत मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

बोरवडे येथे मतदान खोल्या पूजताना किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. मात्र नंतर उत्साहात मतदान सुरु झाले. बोरवडे येथे दुपारपर्यंत चुरशीने ८0 टक्के मतदान झाले. ९0 टक्के मतदान होण्याची शक्यता, आहे. चुरस असल्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या केंद्रावर आजीला मतदान केंद्रावर नेण्यासाठी दोन गटात बाचाबाची झाली

कागल तालुक्यताील बामणी येथे शांततेत ५0 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. सेनापती कापशीसह परीसरातील ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांसह कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. कसबा सांगाव येथील केंद्रावर महिला मतदारांची गर्दी मोठी होती. कसबा सांगाव येथील केंद्र क्र. ५ वर सकाळी ९.१५. वाजताच मतदारांनी मोठी गर्दी केली होती.पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धोबीपछाड होणार  : सतेज पाटील

उजळाईवाडी येथील मतदान केंद्रावर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी ग्रामविकास राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्नी प्रतिमा पाटील यांच्यासोबत आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धोबीपछाड होणार असून काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेची फसवणूक भाजपने केली असून जागृत मतदार याचा विचार करून मतदान करेल त्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळेल असेही त्यांनी यावेळी भाकीत केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक