कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचे गेल्या २४ तासात ६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर लसीकरण मोहिमेत शनिवारी जिल्ह्यातील ८४८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात ५७२ महिलांचा तर २७६ पुरुषांचा समावेश आहे.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४, करवीर तालुक्यात १, आजरा तालुक्यात १ रुग्ण आढळला आहे. ६७ वर्षांच्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये २५० जणांची तपासणी करण्यात आली असून ८८६ जणांचे स्वॅब घेण्यात आले, तर ९८ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून ७८ जणांवर उपचार सुरू असून २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
येत्या आठवड्यातही लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र केंद्रे बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दिवसभरात जिल्ह्यातील ११ केंद्रांवर झालेले लसीकरण
१ उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज ९२
२ आयजीएम ५३
३ ग्रामीण रुग्णालय कागल ६९
४ सावित्रीबाई फुले हॉस्पिटल १०१
५ राजारामपुरी १००
६ पंचगंगा हॉस्पिटल ७५
७ महाडिक माळ ७०
८ सदरबझार १५०
९ सीपीआर १८
१० सेवा रुग्णालय ३५
११ ग्रामीण रुग्णालय शिरोळ ८५