शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

५८ कोटींची कामे मंत्रालयातच--फाईल दीड महिने अडकून :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:43 IST

कोल्हापूर : शासकीय लालफितीचा कारभार कसा असतो याचा अनुभव शहरातील विकासकामांच्या बाबतीत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला प्रथमच अनुभवावा लागत आहे.

ठळक मुद्देलालफितीचा कारभाराचा महापालिका प्रशासनाला अनुभव

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासकीय लालफितीचा कारभार कसा असतो याचा अनुभव शहरातील विकासकामांच्या बाबतीत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला प्रथमच अनुभवावा लागत आहे. राज्य सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या निधीपैकी ५८ कोटींच्या विकासकामांच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याने ही कामे दीड महिने केवळ ‘फाईल बंद’ राहिली आहेत. मंजुरी देण्यात विलंब होण्यामागे तांत्रिक कारण आहे की आर्थिक याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील ड्रेनेजलाईन तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता सोबत दुधाळी झोनअंतर्गत ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामाच्या खर्चाची अंदाजपत्रके तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आली. त्यासाठी अमृत योजनेतून १३९ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तांत्रिक समितीची मंजुरी आणि निधीची उपलब्धता मिळाल्यामुळे महापालिका पाणीपुरवठा प्रशासनाने याबाबतची निविदा प्रक्रिया राबविली.

दुधाळी झोनअंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाची निविदा एका ठेकेदाराने नऊ टक्के जादा दराने भरली होती. ही निविदा निकषांप्रमाणे कमी दराची ठरल्याने महापालिकेने ठेकेदार निश्चित केला; परंतु वाढीव नऊ टक्के दरामुळे कामाची किमत साडेपाच ते सहा कोटींनी वाढणार असल्याने हा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारच्या तांत्रिक समितीकडे पाठविण्यात आला.

त्यानंतर या समितीने ठेकेदाराशी चर्चा करून दरात घासाघीस (निगोशिएशन)केली. नऊ टक्के जादा दराची ही निविदा ७.९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. सर्व प्रक्रिया झाली. निगोशिएशन झाले; पण अंतिम मंजुरी मात्र संबंधित यंत्रणेकडून अद्याप मिळालेली नाही.गेली दीड महिना झाले, या कामाच्या मंजुरीची प्रतीक्षा महानगरपालिका प्रशासनास लागून राहिली आहे. हे काम थांबविण्याबाबत वेगळी चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. कामाच्या तांत्रिक अडचणींमुळे ही अंतिम मंजुरी रखडली आहे की अन्य कोणत्या कारणाने रखडली, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

आमच्याकडून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. ठेकेदाराबरोबर दराबाबत चर्चा होऊन निर्णयही झाल्याचे माहीत आहे. आम्ही या कामासाठी पाठपुरावा करतोय; परंतु कक्ष अधिकाºयांकडून अंतिम मंजुरीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.- सुरेश कुलकर्णी, जलअभियंता