शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

५६२ पोलीसपाटील, कोतवाल पदांसाठी भरती

By admin | Updated: November 20, 2015 00:39 IST

सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध होणार : जिल्ह्यात आज सोडतीमधून आरक्षण जाहीर होणार

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या कोतवाल व पोलीसपाटील पदांची भरती आता होणार आहे. दोन्ही मिळून ५६२ पदांसाठी ही भरती होत असून, यासाठी सोमवारी (दि. २३) जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. तर या पदांचे आज, शुक्रवारी सोडतीमधून आरक्षण काढले जाणार आहे.ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यातील दुवा असणाऱ्या पोलीसपाटलांची जिल्ह्यासाठी १११८ पदे मंजूर असताना त्यापैकी फक्त ६३७ पदे भरली असून, ४८१ पदे रिक्तआहेत. त्याचबरोबर कोतवालांचीही जिल्ह्यात ८१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. पोलीसपाटील पदाची भरती प्रक्रिया संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. यासाठी त्यांची नियुक्ती प्राधिकर म्हणून निवड करण्यात आली आहे, तर कोतवाल पदाच्या भरतीचे अधिकार हे तहसीलदारांना देण्यात आले असून तेही नियुक्ती प्राधिकर आहेत. याकरिता निवड समिती तयार करण्यात आली असून, प्रांताधिकारी अध्यक्ष, तहसीलदार सदस्य सचिव तर नायब तहसीलदार सचिव आहेत.भरतीसाठी पदांच्या आरक्षणाची सोडत आज, शुक्रवारी संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी काढली जाणार आहे. त्यानंतर भरतीसाठी सोमवारी (दि.२३) जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यानंतर उमेदवारांकडून ज्या-त्या प्रांताधिकारी कार्यालयस्तरावर अर्ज स्वीकारायला सुरुवात होणार आहे.एक पोलीसपाटील आणि दोन गावांचा कारभार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीसपाटील भरती प्रक्रियेवरील स्थगिती अद्याप उठविली नसल्याने पोलीसपाटलांवर भार होत होता. या निमित्ताने हा भार हलका होईल. गावातील तंटे गावपातळीवरच मिटविणे, गावात एखादी घटना अथवा दुर्घटना घडली तर त्याची पोलिसांना वर्दी देणे, अशा स्वरूपाचे पोलीसपाटील यांचे काम असते. सध्या पोलीसपाटलांना महिन्याला शासनाकडून पाच हजार रुपये मानधन मिळते. (प्रतिनिधी)पोलीसपाटील सद्य:स्थितीउपविभागमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे करवीर१५५६३९२ इचलकरंजी१०२४९५३ राधानगरी-कागल१९८९९९९गडहिंग्लज२२८२००२८भुदरगड-आजरा२०२१३१७१पन्हाळा२३३९५१३८पोलीसपाटलांची जिल्ह्यासाठी १११८ पदे मंजूर आहेत. यापैकी फक्त ६३७ पदे भरली आहेत. तर अजून ४८१ पदे रिक्तआहेत.