शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार, पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:13 IST

Jalyukt Shivar, kolhapurnews राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ५६ कोटींचे जलयुक्त शिवार पाच वर्षांत १०० टक्के कामे पूर्ण

कोल्हापूर : राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोरात राबवले गेले. या कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर ह्यकॅगह्णनेही ताशेरे ओढल्याने अखेर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय विद्यमान महाविकास आघाडीने सरकारने केला आहे. यावरून आजी-माजी सत्ताधाऱ्यांमध्ये वाक‌्युद्ध रंगले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील या अभियानाचा आढावा घेतला असता कागदोपत्री शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसते. कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या या अभियानाने सर्व सरकारी विभागांना सोबत घेत काम पूर्णत्वासह निधीही खर्च केला आहे.

पाच वर्षांत झालेल्या कामामुळे नऊ हजार ७८३ टीसीएम पाण्याची साठवणूक क्षमताही वाढीस लागली आहे. यात मोठे काम होते, ते कळंबा तलावातील गाळ काढणे, जाखले व तमदलगेसह जोतिबा डोंगरावरील तलावांचे पुनरुज्जीवन करणे. यात चांगले यशही आले आहे.तथापि इतर लहानसहान कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडी केल्याने ही कामे केली होती का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गावागावांत झाली होती. लोकसहभागातून कामे करावयाची असताना आणि कुशल-अकुशलचा रेशो सांभाळायचा असतानाही जेसीबीसारख्या यंत्रांनी कामे झाले आहेत. ठेकेदारांना पोसण्याचे काम या योजनेने चांगल्या प्रकारे केले.

  • निवडलेली गावे : १८०
  • पाच वर्षांसाठीचा मंजूर आराखडा : ७१ कोटी ७७ लाख
  • आराखड्यानुसार मंजूर कामे : २३५४
  • पूर्ण झालेली कामे : २३५४
  • खर्च झालेला निधी : ५६ कोटी ५१ लाख ७४ हजार
  • सिंचन क्षमता : ९ हजार ७८३ टीसीएम

ही झाली कामेतलावांतील गाळ काढणे, शेततळे, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, सलग समतल व खोल चर अशी कामे झाली आहेत. 

जिल्ह्यात जलयुक्तचे शंभर टक्के काम झाले असून निधीही खर्च पडला आहे, शासनाने मागवलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा अहवाल पाठवला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारkolhapurकोल्हापूर