शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी सरपंचदासाठी २८५ तर सदस्यपदासाठी १२३५ अर्ज दाखल करण्यात आले. आजअखेर सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांकडून सुमारे ५६७ तर सदस्यपदासाठी २८१५ उमेदवारांनी २८५२ अर्ज दाखल केले. ४७२ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत असून मंगळवारीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक केंद्रांमध्ये उमेदवार, समर्थकांची गर्दी होती.शुक्रवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी सरपंचदासाठी २८५ तर सदस्यपदासाठी १२३५ अर्ज दाखल करण्यात आले. आजअखेर सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांकडून सुमारे ५६७ तर सदस्यपदासाठी २८१५ उमेदवारांनी २८५२ अर्ज दाखल केले. ४७२ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत असून मंगळवारीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक केंद्रांमध्ये उमेदवार, समर्थकांची गर्दी होती.शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर दि. १६ आॅक्टोबरला मतदान आहे. अद्याप पक्षीय पातळीवर नेत्यांनी आपले पत्ते खुले न केल्याने स्थानिक आघाड्या तयार होण्याची शक्यता आहे.गडहिंग्लज तालुक्यातसदस्यसाठी ६६ अर्ज दाखलगडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात सात गावांच्या सरपंचपदासाठी सात, तर १५ गावांच्या सदस्यपदासाठी आज एकूण ६६ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारअखेर सरपंचपदासाठी एकूण ३१, तर सदस्यपदासाठी एकूण १९६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण ८९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.करवीर तालुक्यातसरपंचपदासाठी २२ अर्जकसबा बावडा : करवीर तालुक्यामधील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी २२, तर सदस्यपदासाठी १८६ असे एकूण २०८ अर्ज दाखल झाले आहेत.शाहूवाडीतून सरपंचपदासाठी२० अर्ज दाखलमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी २०, तर सदस्यपदासाठी ९० अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत सरपंचपदासाठी ४८, तर सदस्यपदासाठी १९८ अर्ज दाखल झाले आहेत.शिरोळमध्ये सरपंचपदासाठी १७,तर सदस्यांचे ७९ अर्ज दाखलशिरोळ : शिरोळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी १७, तर सदस्यपदासाठी ७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सरपंचपदासाठी शिवनाकवाडी १, हेरवाड ३ व खिद्रापूर २ असे एकूण ६ अर्ज दाखल झाले. तर सदस्यपदासाठी शिवनाकवाडी ५, राजापूरवाडी १, अकिवाट १, कवठेसार २, खिद्रापूर ४, हेरवाड ८, कनवाड ११, राजापूर ४ असे एकूण ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.कागलमधून सरपंचपदासाठी२६ अर्ज दाखलकागल : कागल तालुक्यातील २६ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारीही सरपंचपदासाठी २६, तर सदस्यपदासाठी ११९ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सरपंचपदासाठी ४३, तर सदस्यपदासाठी एकूण १८५ अर्ज दाखल झाले.गगनबावडा सरपंचपदासाठीपाच अर्ज दाखलगगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी पाच, तर सदस्यपदासाठी २६ असे एकूण ३२ अर्ज दाखल झाले. २१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह १५९ सदस्य निवडले जाणार आहेत.आजºयात सरपंचपदासाठी ११, तर सदस्यपदासाठी ५३ अर्ज दाखलआजरा : आजरा तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पाचव्या दिवशी, मंगळवारी सरपंचपदासाठी ११ उमेदवारांनी, तर सदस्यपदासाठी ५२ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. मंगळवारी दिवसभरात ६४ अर्ज दाखल झाले. आजपर्यंत सरपंचदासाठी ४३, तर सदस्यपदासाठी १४२ अर्ज दाखल झाले आहेत.पन्हाळ्यात सरपंचपदासाठी२६ अर्ज दाखलपन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील १७ गावातून सरपंचपदासाठी २३ उमेदवारांनी २६ अर्ज तर सदस्यपदासाठी २० गावांतून १३९ जणांनी १४९ अर्ज दाखल केले. आजपर्यंत सरपंचपदासाठी ८८, तर सदस्यपदासाठी ४५१ अर्ज आले आहेत.हातकणंगलेत सरपंचपदासाठी१५ अर्ज दाखलहातकणंगले : हातकणंगले तालुक्यात पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १५ तर सदस्यपदासाठी १४४ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर तालुक्यातून सरपंचपदासाठी ६९ तर सदस्यांसाठी ५१३ अर्ज दाखल झाले आहेत.राधानगरीत सरपंचपदासाठी२९ अर्ज दाखलराधानगरी : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सरपंचपदासाठी २९, तर सदस्यपदासाठी १३१ अर्ज दाखल झाले. अर्जांसोबत जोडायच्या कागदपत्रांबाबतही मतमतांतरे असल्यामुळेही इच्छुकांचा गोंधळ उडत आहे.भुदरगडमध्ये सरपंचपदासाठी९५ अर्ज दाखलगारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी सरपंचपदाचे ९५, तर सदस्यपदासाठी १६१ अर्ज दाखल झाले. मुदाळमधून विक्रमी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत सरपंचपदाचे १२८, सदस्यपदाचे २४0 अर्ज दाखल झाले.सर्व्हर डाऊनचा त्रास, यंत्रणाही सुस्तकागलमध्ये आॅनलाईन माहिती भरण्याच्या प्रकियेचा त्रास इच्छुकांना होत असून, वारंवार सर्व्हर डाऊनसारखे प्रकार होत असल्याने दिवस दिवस थांबूनही अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण होत नाहीत. तसेच शासकीय यंत्रणाही सुस्त दिसत आहे. परिणामी, अर्ज भरण्यात म्हणावा तसा वेग दिसत नाही. गगनबावड्यातही आॅनलाईन अर्ज भरतांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने उमेदवार रात्रीचे जेवण उरकून महा-ई सेवा केंद्रावर अर्ज भरायला येत आहेत. यामुळे याठिकाणी रात्रीची गर्दी दिसून येत आहे.हातकणंगले, करवीरमधून सर्वाधिकसरपंचपदासाठी पन्हाळा तालुक्यातून सर्वाधिक ८१ उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले. राधानगरी तालुक्यातून ७६ उमेदवारांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केले आहेत. सदस्यपदासाठी हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक ५१३ उमेदवारांनी ५१५ अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातून ५०१ उमेदवारांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला आहे.