शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘५५ कोटी नि गांधी हत्या’: गांधीजींबद्दल प्रेम, आस्था निर्माण करणारे नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:23 IST

कोल्हापूर : मानवी मनाचा वेध घेत, महात्मा गांधीजींबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे काम करीत, महात्मा गांधीजींच्या कार्याचे समर्थन करण्याचे काम ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ व निर्मिती विचार मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ...

कोल्हापूर : मानवी मनाचा वेध घेत, महात्मा गांधीजींबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे काम करीत, महात्मा गांधीजींच्या कार्याचे समर्थन करण्याचे काम ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ व निर्मिती विचार मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ७० वर्षांनंतर महात्मा गांधीजींच्या खुनाची वस्तुस्थिती ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्याबद्दलचे योगदान, त्यांच्या त्या काळातील संघर्षमय प्रवासासह ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हे नाटक महात्मा गांधीजींना भारत देशाचे, या देशावर प्रेम करणारे नेते म्हणून पुढे आणण्याचे काम करते. भारत देश, त्यातील विविधता, विविध राजकीय पक्ष, विविध विचारसरणी यांचा मागोवा घेत असताना महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेले वातावरण, त्यांची विचार करण्याची क्षमता यांवर भाष्य, या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. महात्मा गांधीजींना विरोध करणाऱ्या, त्यांना नाकारणाºया विचारसरणीच्या प्रक्रियेवरही हे नाटक भाष्य करते.विद्रोही लेखक पार्थ पोळके यांनी ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हा विषय अतिशय आस्थेने आणि प्रामाणिकपणे, इतिहासाचा आढावा घेत मांडला आहे. संशोधनाच्या पातळीवर पुरावे देत गांधीजींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात नवकलाकार असलेतरी त्यांनी केलेला हुबेहूबअभिनय लोकांच्या काळजाला भिडणारा आहे.या नाटकाचे लेखन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले आहे. दिग्दर्शक किरण पवार, निर्मिती शशी गाडे, रंगभूषा प्रशांत इंगवले, वेशभूषा स्नेहा धडवाई, तर संगीत ओमेस साठे यांचे आहे. नाटकाचे आयोजन रघुनाथ कांबळे, सुरेश केसरकर, करुणा मिणचेकर, कमलाकर सारंग, प्रभाकर पाटील, सुरेखा भोसले, अनिल म्हमाने यांनी केले होते. नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.