शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्याकडील ५०० प्रकरणांची छाननी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:05 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

ठळक मुद्देघरफाळ्याकडील ५०० प्रकरणांची छाननी होणारदोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. महासभेत घरफाळ्यावरून जोरदार चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तीन निर्णय घेतले.या प्रकरणी प्रशासनाकडे आलेल्या वादग्रस्त ५०० प्रकरणांची छाननी करण्याचे काम उपायुक्त निखिल मोरे व साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे सोपविण्यात आले. याशिवाय साहाय्यक आयुक्त औंधकर यांना अतिरिक्त जबाबदारी म्हणून यापूर्वी दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांत पोलीस विभाग व महापालिका विधि विभाग यांच्यातील समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या उच्च न्यायालयात तसेच स्थानिक न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या अनुषंगाने वेळोवेळी प्रशासनाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पॅनेलवरील वकील विवेक घाटगे व मुकुंद पोवार यांना दिली आहे.घरफाळा विभागातील काही प्रकरणांची माहिती नगरसेवक भूपाल शेटे व नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्याकडून प्रशासनाला प्राप्त होत आहे. या प्रकरणाची छाननी केली जाणार आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचे धोरण आयुक्त कलशेट्टी यांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वरील निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर