शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

५० डुकरांच्या रक्तनमुन्यांची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:00 IST

‘निपाह’साठी प्रत्येक जिल्ह्यात उपाययोजना; वटवाघळांवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना

कोल्हापूर : ‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. आठ दिवसांत हे नमुने पुण्याला विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडे पाठवायचे आहेत.केरळमध्ये ‘निपाह’च्या विषाणूंची लागण झाल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावर लस, उपचार उपलब्ध नसल्याने याचे गांभीर्य वाढले असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनानेही पावले उचलली आहेत. डुकरे आणि वटवाघळांच्या माध्यमातून या रोगाचे विषाणू पसरत असल्याने या दोन घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.त्यानुसार राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी अधिकाºयांशी चर्चा केली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून ५० डुकरांचे रक्तनमुने घेऊन ते आठ दिवसांत पुण्याला चाचणीसाठी पाठवायचे आहेत. तसेच वटवाघळांच्या वस्तीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.प्रत्येक तालुक्यासाठी पथक‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याला जलद प्रतिसाद पथक नेमण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये एक पशुसंवर्धन विभागाचा डॉक्टर आणि वटवाघळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचाही एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.‘मास्क’ घालून रक्तनमुने घ्याडुकरांचे रक्तनमुने घेतानाही ‘एनक्यू ५’ हे विशिष्ट प्रकारचे मास्क वापरूनच रक्तनमुने घेण्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. अशा प्रकारचे मास्क हे विषाणू प्रतिबंधक असतात.खाण्याचा सोडा,चुना फवारणीज्या ठिकाणी वटवाघळांची वस्ती आहे, अशा झाडांखाली खाण्याचा सोडा आणि चुन्याच्या भुकटीची फवारणी करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. वटवाघळांच्या विष्ठेतून या रोगाचा प्रसार होत असल्याने याबाबत दक्षता घेण्यास सांगण्यात आले असून, या फवारणीतून प्रसाराला प्रतिबंध होणार आहे. ही फवारणी तातडीने करावी, असेही फर्मान सोडण्यात आले आहे़

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू