शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वनस्पती, फळझाडांच्या ४६६ प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:24 IST

कोल्हापूर शहर परिसरात जैवविविधतेच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशा एकूण ८०६ प्रजाती आढळून आल्याची माहिती महापालिकेतील जैवविविधता समितीच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

ठळक मुद्देशहरात वनस्पती, फळझाडांच्या ४६६ प्रजातीपक्षांच्या २३१ प्रजाती : जैवविविधता नोंदी

कोल्हापूर : शहर परिसरात जैवविविधतेच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशा एकूण ८०६ प्रजाती आढळून आल्याची माहिती महापालिकेतील जैवविविधता समितीच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.या नोंदीमध्ये झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या ४६६ प्रजाती, पक्षी २३१ प्रजाती, फुलपाखरू ३५ प्रजाती, सरपटणारे प्राणी २५ प्रजाती, मासे २६ प्रजाती, सस्तन प्राणी २३ प्रजाती, अशा एकूण ८०५ प्रजातींचा समावेश आहे.महापालिका अधिकार क्षेत्रातील जैवविविधता नोंदीबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे बैठकीत नोंदवहीस मान्यता देण्यात आली. स्थानिक स्तरावरील तज्ज्ञांच्या सहायाने जैवविविधतेबाबत माहिती संकलित करून नोंदवही प्राथमिक टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आली. निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर, सचिव अनिल चौगुले, विज्ञान प्रबोधनी संस्थेचे उदय गायकवाड, मच्छिमार संस्थेचे प्रतिनिधी अमर जाधव, वनविभाग कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली ही माहिती संकलित करण्यात आली आहे.बैठकीत जैवविविधता कार्यप्रणाली यशस्वीरित्या राबविण्याकरिता पुढील आर्थिक वर्षामध्ये स्वतंत्र तरतूद करण्याची सूचना करण्यात आली. तसेच महापालिकेच्या ५४ उद्यानांपैकी एका उद्यानामध्ये तुळस, कोरफड, आवळा, अडुळसा इत्यादी वनऔषधी वृक्षांची लागवड करून वनऔषधी उद्यान विकसित करण्याबाबत, तसेच महावीर उद्यानातील मत्सालयात विविध जातीचे मासे नव्याने उपलब्ध करून पर्यटक आकर्षित होतील याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

अग्निशामन विभागामार्फत अहिंसक पद्धतीने मधमाश्यांचे पोळे काढण्याकरिता आवश्यक पोशाख खादी ग्रामोद्योग विभागाकडून खरेदी करावा, अशी सूचना महापौर लाटकर यांनी केली.उदय गायकवाड यांनी कै. नीलिशा देसाई यांच्या कुटुंबामार्फत मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी आवश्यक असलेले किमान दोन पोशाख महापालिकेस देणार असल्याचे सांगितले. या अनुषंगाने समितीमधील रिक्त पदी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. असावरी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मत्स्य विभागचे सुदर्शन पावसे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. ए. जी. भोईटे, उद्यान अधीक्षक अनिकेत जाधव, सहायक अधीक्षक अपर्णा जाधव उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर