शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:28 IST

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे.बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.

कोल्हापूर : येथील राजारामपुरीतील जननी हॉस्पिटलमध्ये राज्यातील सर्वाधिक ५ किलो वजनाचे आणि सर्वाधिक उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून हे कोल्हापुरातील प्रसुतिशास्त्रातील पहिलेच उदाहरण आहे.प्रसुती झालेल्या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात.

माहेर कोल्हापुरात असल्याने त्या प्रसुतीसाठी येथे आल्या. त्या डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे उपचार घेत होत्या. एखाद्या बाळाची उंची किंवा वजन जास्त असेल तर मातेची नैसर्गिक प्रसुती होत नाही. मात्र, या बाळाच्या मातेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. बाळाचे वजन ५ किलो तर उंची ६० सेंटिमीटर इतकी आहे.

वजन आणि उंची दोन्हीच्या जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ आहे. यापूर्वी गुजरातमधील बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे. राज्यात पहिल्यांदाच हे पाच किलो वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मले आहे.

सर्वाधिक वजनाचे बाळ नैसर्गिकरित्या जन्मल्याचे हे राज्यातील पहिलेच उदाहरण आहे. बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.- डॉ. सरोज शिंदे