शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

सायबर इन्स्टिट्यूटला ‘रूसा’कडून पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 14:08 IST

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाकडून (रूसा) छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्चला (सायबर) विविध उपक्रमाअंतर्गत पाच कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. देशातील १५ स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. या केंद्राचे उदघाटन रविवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उदघाटन होणार आहे, अशी माहिती सायबरचे ‘रूसा’ समन्वयक डॉ. सी. एस. दळवी आणि संचालक डॉ. एम. एम. अली यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसायबर इन्स्टिट्यूटला ‘रूसा’कडून पाच कोटींचा निधीउद्योजकता केंद्राचे रविवारी उदघाटन; नवउद्योजकांना देणार प्रशिक्षण

कोल्हापूर : राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाकडून (रूसा) छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्चला (सायबर) विविध उपक्रमाअंतर्गत पाच कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. देशातील १५ स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्र सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. या केंद्राचे उदघाटन रविवारी (दि. ३) दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने उदघाटन होणार आहे, अशी माहिती सायबरचे ‘रूसा’ समन्वयक डॉ. सी. एस. दळवी आणि संचालक डॉ. एम. एम. अली यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. दळवी म्हणाले, रूसाने देशातील ४८०० संस्थांपैकी पात्र असणाऱ्या ५५० शिक्षण संकुलांची विविध निकषांवर चाचणी घेतली. त्यातून नऊ स्वायत्त संस्था निवडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सायबरचा समावेश आहे. रूसाकडून मिळालेला निधी हा शिक्षक प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटायझेशन, उद्योजकता केंद्र आदींसाठी खर्च केला जाणार आहे.

उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून नवउद्योजकांना उद्योगाची सुरूवात, व्यवस्थापन आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योजकांना कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेस सायबरचे विश्र्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. दिपक भोसले, प्रा. सचिन जगताप, आदी उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन‘सायबर’चे संस्थापक प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार (दि. ३) ते मंगळवार (दि.५) दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये रविवारी सकाळी पावणेदहा वाजता रक्तदान शिबीर, दहा वाजता आनंद ग्रंथोत्सवाचे उदघाटन आणि सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर आंतरमहाविद्यालयीन महोत्सव आणि सीएनसीव्हीसी डब्ल्यू वार्षिक प्रदर्शन होणार असल्याची माहिती डॉ. हिलगे यांनी दिली. 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर