शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राज्यातील ५ सहकारी साखर कारखाने लिलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हंगामभर पुरेल इतक्या उसाची शाश्वती नाही, उसाचे क्षेत्र वाढेल असे प्रयत्न नाहीत, ...

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हंगामभर पुरेल इतक्या उसाची शाश्वती नाही, उसाचे क्षेत्र वाढेल असे प्रयत्न नाहीत, गैरव्यवस्थापन... अशा अनेक कारणांनी गेली कित्येक वर्षे तोट्यात असलेले राज्यातील पाच सहकारी साखर कारखाने आणि प्रत्येकी एक सूतगिरणी व दालमिल संस्था राज्य बँकेने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थांकडे राज्य बँकेचे तब्बल ७०४ कोटी ५९ लाख रुपये अडकले आहेत. त्यासाठी निविदा मागविल्या असून १६ मार्चला त्याचा निर्णय होणार आहे. पाच कारखान्यांवरील थकीत कर्ज ६३२ कोटी ७७ लाख रुपये आहे.

अन्य चार सहकारी साखर कारखाने व एक सूतगिरणी भाडेतत्त्वावर चालवायला देण्यासाठीही निविदा मागवल्या आहेत. परंतु विक्रीस काढलेले कारखाने व अन्य संस्थाही घेणार कोण, हा कळीचा मुद्दा आहे. त्यातील बहुतांशी कारखाने तर भंगारात वजनांवर विकावे लागतील, अशा स्थितीत असण्याची शक्यता आहे. मुळात विदर्भ व मराठवाड्यात प्रचंड उन्हाळा असतो. अजूनही सिंचनाच्या पुरेशा सुविधा नाहीत. सरासरी अडीच हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला कारखाना हंगामात किमान चार लाख टनाचे गाळप झाले तरच तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. परंतु पुरेसा ऊस नाही म्हणून गाळप नाही, गाळप नाही म्हणून तोटे वाढतात, तोटे वाढले म्हणून ऊसबिले थकीत आणि बिलेच मिळणार नसतील तर शेतकरी ऊस घालत नाहीत, अशा चक्रव्यूहात अडकलेले हे कारखाने आहेत. यातील साहेबराव डोणगावकर यांचा गंगापूरसारखा कारखाना तर १९७२ चा आहे. साधारणत: १९७२ ते १९९० च्या दरम्यानचे हे कारखाने आहेत. आता हे कारखाने विकत घेऊन तिथे नव्याने चालवण्याचे धाडस कोण करेल, अशी शक्यता फारच धूसर आहे. त्यामुळे ते भंगारात विकणे व मिळेल ते कर्ज खात्याला जमा करून घेणे, एवढ्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे.

------------------------------

कोट...........

थकीत कर्जाची रक्कम निविदा उघडण्यापूर्वी न भरल्यास जप्त मालमत्ता विक्री करून कर्जवसुली केली जाईल. संपूर्ण कर्ज वसूल न झाल्यास कर्जदार व जामिनदार यांच्याकडून ही वसुली केली जाईल.

- डॉ अजित देशमुख,

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई.

------------------------------

विक्रीस काढलेले कारखाने व कर्जाचे ओझे...

१. जय किसान बोदेगाव (जि. यवतमाळ)- २२२ कोटी

२. पांझराकान भाडणे (जि. धुळे) - ८१ कोटी ५५ लाख

३.बापूरावजी देशमुख वेळा (जि. वर्धा) - १२९ कोटी २२ लाख (इतर बँका ३३ कोटी)

४. जिजामाता दुसरबीड (जि. बुलडाणा)- ७९ कोटी

५.गंगापूर रघुनाथनगर (जि. औरंगाबाद)- ८८ कोटी

६. अकोट सूतगिरणी (जि. अकोला)- ६७ कोटी २५ लाख

७.शेतकरी दालमिल मलकापूर (जि. लातूर)- ४ कोटी ५७ लाख

------------------------------

भाडेतत्त्वावर देणाऱ्या संस्था

१. दत्ताजीराव कदम सूतगिरणी कौलगे (जि. कोल्हापूर)- १० कोटी

२. जय जवान साखर नळेगाव (जि. लातूर)- ७८ कोटी

३. महेश साखर कडा (जि. बीड)- ३२ कोटी ७८ लाख