शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

कोल्हापूरात ४८ हजार बालकांना पल्स पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:06 IST

केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

ठळक मुद्देकोल्हापूरात ४८ हजार बालकांना पल्स पोलिओचा डोसउद्याच्या उपक्रमाकरिता महापालिका यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्या, रविवारी शहर हद्दीतील ४८ हजार २८२ बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले असून, सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. या मोहिमेनंतर नियमित लसीकरणालाही महत्त्व देण्यात येईल आणि तशी यंत्रणा महापालिकेच्या सर्व रुग्णालयांत सुरू ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.देशात जानेवारी २०११ पासून आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून प्रथमच अशा पद्धतीने यश मिळाले आहे. २७ मार्च २०१४ रोजी भारतास पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. परंतु नजीकच्या राष्ट्रात पोलिओ रुग्ण आढळून येत असल्याने जागतिक पोलिओ निर्मूलन होईपर्यंत ही मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.या वर्षीच्या मोहिमेच्या सत्रात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत. प्रत्येक वर्षी दोन डोस पाजले जात होते. यावेळी तो एकच दिला जाणार आहे. मोहिमेकरिता सात कुटुंब कल्याण केंद्रांसह, एस. टी. स्टॅँड, रेल्वे स्टेशन, वाशी नाका, फुलेवाडी नाका, शिरोली नाका, ऊस कामगारांच्या छावण्या, आदी १७३ केंद्रावर हे डोस पाजले जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.पोलिओ या अपंगत्व निर्माण करून असाहाय्य बनविणाऱ्या रोगापासून नव्या पिढीची कायमपणे सुटका करण्याच्या या महत्त्वाच्या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, आरसीएच नोडल आॅफिसर डॉ. अमोलकुमार माने, पल्स पोलिओ कार्यक्रमाधिकारी डॉ. रूपाली यादव, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका