शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 20:06 IST

corona virus Kolhapur- गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात नवे ४७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी कोल्हापूर शहरामधीलच तब्बल ३२ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार २५३ पॉझीटिव्हपैकी ४८ हजार ३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १७५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकूण १ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण, संख्या लागली वाढूलोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज

कोल्हापूर : गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात नवे ४७ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी कोल्हापूर शहरामधीलच तब्बल ३२ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका क्षेत्रात तीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ५० हजार २५३ पॉझीटिव्हपैकी ४८ हजार ३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १७५ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एकूण १ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला.आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त ४७ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-१, गडहिंग्लज-१, हातकणंगले-२, कागल-१, करवीर-१, पन्हाळा-१, नगरपरिषद क्षेत्र- ३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३२ व इतर जिल्हा व राज्यातील ५ नवे रुग्ण आढळले आहेत.दिवसभरात १३९ जणांची आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी तपासणी करण्यात आली असून ११४ अहवाल निगेटिव्ह तर १४ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यातील ११ अहवाल नाकारण्यात आले आहेत. ११२ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून पैकी १०६ अहवाल निगेटिव्ह तर ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. खासगी रुग्णालये, लॅब मध्ये २०१ अहवालापैकी १७४ निगेटिव्ह तर २७ पॉझीटिव्ह असे एकूण ४७ अहवाल पॉझीटिव्ह आहेत.आजअखेर रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -आजरा-८८७, भुदरगड- १२३६, चंदगड- १२२८, गडहिंग्लज- १५०६, गगनबावडा- १५२, हातकणंगले-५३२५, कागल-१६८४, करवीर-५७३२, पन्हाळा- १८७१, राधानगरी-१२५४, शाहूवाडी-१३६३, शिरोळ- २५१२, नगरपरिषद क्षेत्र-७५१३, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- १५ हजार ५३२ असे एकूण ४७ हजार ७९५ आणि इतर जिल्हा व राज्यातील -२ हजार ४५८ असे मिळून एकूण ५० हजार २५३ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर