कोल्हापूर : जिल्ह्यासाठी रविवारी कोविशिल्डचे ४५ हजार डोस उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यामुळे शहर, जिल्ह्यात लसीकरणाला काही प्रमाणात गती मिळणार आहे. उपलब्ध झालेली लस ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहे.
प्राप्त लसीच्या डोसचे तालुकानिहाय वाटप असे : आजरा : १ हजार ७१०, भुदरगड : १ हजार ८९० , चंदगड : २ हजार ५६०, गडहिंग्लज : ३ हजार २८०, गगनबावडा : ५००, हातकणंगले : ९ हजार २००, कागल : २ हजार ५८०, करवीर : ४ हजार ५६० , पन्हाळा : २ हजार ६४०, राधानगरी : २ हजार ६६०, शाहुवाडी : २ हजार ९२०, शिरोळ : ४ हजार १६०, सीपीआर रुग्णालय : ३४०, सेवा रुग्णालय, (कसबा बावडा ) : ५००, कोल्हापूर महापालिका : ५ हजार ५००.