शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
5
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
6
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
7
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
8
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
9
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
10
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
11
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
12
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
13
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
14
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
15
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
16
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
17
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
18
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
19
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
20
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

प्रस्ताव आल्यानंतरच ४५ रुपये अनुदान

By admin | Updated: June 7, 2016 07:39 IST

साखर निर्यातीचे पैसे : जिल्ह्यातील कारखान्यांना ६५ कोटी ९७ लाख मिळणाार; अध्यादेशानंतर अनुदान नाही

कोपार्डे : हंगाम २०१५/१६ मधील एफ.आर.पी.तील ४५ रुपये प्रतिटन कपात करूनच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिल अदा केली आहेत. केंद्राने एकूण साखर उत्पादनाच्या ११ टक्के साखर निर्यात केल्यानंतर हे अनुदान दिले जाईल, असे जाहीर केले होते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी त्याप्रमाणे साखर निर्यात केली असली तरी अनुदान मिळणार का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी १८ मे रोजी निघालेल्या अध्यादेशाप्रमाणे मेपर्यंत निर्यात करणाऱ्या कारखान्यांना प्रस्ताव दाखल करताच ४५ रुपये मिळण्याचे संकेत असल्याचे या उद्योगातील एका तज्ज्ञाने सांगितले. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र, जागतिक व्यापार करारानुसार पक्क्या मालावर अनुदान देता येत नसल्याने केंद्र शासनाने गाळप उसाच्या प्रतिटन ४५ रुपये अनुदान जाहीर करीत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे जाहीर केले. यासाठी मात्र साखर कारखान्यांना एकूण उत्पादित साखरेच्या ११ टक्के साखर निर्यात करणाऱ्या कारखान्यांनाच हे अनुदान दिले जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली) ३८ कारखान्यांपैकी बहुतांश कारखान्यांनी ८० टक्क्यांच्यावर साखर दिलेल्या कोट्याप्रमाणे निर्यात केली आहे. (वार्ताहर)प्रस्तावच दाखल नाहीत तर अनुदान कसे मिळणार?कारखान्यांनी साखर निर्यातीचा दिलेला कोटा निर्यात केला आहे. त्याचे प्रस्ताव केंद्राला दाखल करावयाचे आहेत; पण ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने संपूर्ण हंगामातील गाळप, निर्यात याबाबत प्रस्ताव एकावेळी देऊ, अशी भूमिका कारखान्यांनी घेतल्याने केंद्राकडे प्रस्ताव गेल्याशिवाय ४५ रुपये अनुदान कसे मिळणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.