या रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाल्याने या मार्गांवरील ग्रामस्थ व प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण आ. आबिटकर व संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला होता. पण दिलेला निधी अपुरा असल्यामुळे रस्त्याचे काम तारळे खुर्द ते कांबळवाडी फाट्यापर्यंत न जाता घुडेवाडीपर्यंतच येऊन थांबले. तेथून पुढे कांबळवाडी फाटापर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घुडेवाडी व आवळी खुर्द ग्रामपंचायतींनी आ. आबिटकर यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याबद्दल या मार्गांवरील ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले आहे, असे डाॅ. सरावणे यांनी सांगितले.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘‘लोकमत’च्या पाठपुराव्याची आमदार प्रकाश आबिटकर यांनी दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिला आहे, असे घुडेवाडीचे सरपंच डाॅ. सरावणे व आवळी खुर्दच्या सरपंच नंदिनी पाटील यांनी सांगितले.