शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरला ४० अंश सेल्सिअसचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:26 IST

कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली ...

कोल्हापूर : शहरातील तापमानाने ४0 अंश सेल्सिअसवर झेप घेतल्याने एप्रिलमध्येच उन्हाचे चटके बसून, अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पाऊस पडेल, असे वाटत होते. तरीही वळवाने हुलकावणी दिली.गेल्या चार दिवसांपासून तापमानामध्ये वाढ होत आहे. किमान सकाळी ७ पर्यंत तरी हवेत थोडासा गारवा जाणवत होता. तोही नाहीसा झाल्याने रात्रीही नागरिकांना प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. गार वारे येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवल्या, तरी वारे गरमच येत असल्याचा अनुभव गेल्या चार दिवसांपासून येत आहे.सकाळी आठनंतरच अंगातून घामाच्या धारा सुरू असून, सकाळी दहानंतर बाहेर पडायला नको वाटावे, अशी परिस्थिती आहे. सायंकाळी ५ वाजतादेखील अशीच परिस्थिती असून, ज्येष्ठ नागरिकांचेही फिरायला बाहेर पडण्याचे वेळापत्रक बदलले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये दिसणारे चित्र आता कोल्हापुरात दिसायला सुरुवात झाली असून, अनेकजण डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत आहेत. येत्या चार दिवसांत राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.गेल्या आठ-१0 दिवसांत एकीकडे उष्मा जाणवत असताना त्या तुलनेत जोरदार वळीव झालेला नाही; त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा जाणवत आहे. या उष्म्यामुळे कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.