शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘धान्य व्यापारी मंडळाची विद्यायक कामांची ३७ वर्षे---विधायक गणेशोत्सव -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:18 IST

श्रद्धेला विधायक कामाची जोड देऊन लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची गेली ३७ वर्षे अविरतपणे घोडदौड सुरू आहे.

ठळक मुद्दे आपत्तीमध्ये सरसावतात हात रक्तदान व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जोपासली बांधीलकी

लोकमत न्यूज नेटवर्क राजाराम लोंढे, कोल्हापूर : श्रद्धेला विधायक कामाची जोड देऊन लक्ष्मीपुरी येथील कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाची गेली ३७ वर्षे अविरतपणे घोडदौड सुरू आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आधार दिला जातोच; पण नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वांत पुढे जाऊन हात देण्याचे काम मंडळ हिरीरिने करीत आहे.धान्य व्यापारी मंडळाची १९८० ला स्थापना झाली आणि दहीहंडी कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन व्यापाºयांनी घेतला. केवळ मूर्ती प्रतिष्ठापणा न करता त्यातून विधायक काम उभे करण्याचा संकल्प त्यावेळी करण्यात आला. गेली ३७ वर्षे या मार्गाने मंडळाची वाटचाल सुरू राहिली आहे. दरवर्षी महाप्रसाद घातला जातो. अनंत चतुर्दशीच्या अगोदर तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मुगडाळ व तांदळाची तुपात शिजविलेली खिचडी भाविकांना दिली जाते. पोटभर खिचडी दिली जातेच; पण त्याबरोबर प्रत्येकाला बाटली बंद पाणी पिण्यासाठी पुरविले जाते. महाप्रसादाचे वाटप करून मंडळ थांबले नाही, तर जिल्'ात असो किंवा जिल्'ाबाहेर कोठेही नैसर्गिक आपत्ती आली, तर मंडळ सर्वांत पुढे असते. कोल्हापुरात २००५ साली आलेल्या महापुरावेळी अनेक कुटुंबे विस्थापित झाली होती. काही कुटुंबे दसरा चौकातील मठात राहिली होती. या कुटुंबांच्या जेवणाची व्यवस्थाही मंडळाने केली होती. एवढ्यावरच न थांबता समाजातील जे जे लोक मदतीसाठी येतील त्यांना सढळ हाताने मदत करण्याचे काम मंडळाने केले आहे.

समाजातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केले जाते. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणसांना आरोग्य तपासणीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बहुतांशी मंडळे, ट्रस्ट असे उपक्रम राबवितात; पण या शिबिराच्या माध्यमातून दुर्दम्य आजार निदर्शनास आला आणि तातडीने आॅपरेशन करणे गरजेचे असल्यास मंडळ स्वत: पुढाकार घेऊन पुढील उपचार करते.लातूर भूकंपावेळी सर्वांत पहिली मदतलातूर जिल्'ात झालेल्या भूकंपावेळी सर्वांत पहिल्यांदा मंडळाने मदत पोहोच केली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लातूरमधील २२ गावांत जाऊन तीन ट्रक धान्याचे वाटप केले होते.शिस्तबध्द मिरवणुकीबद्दल पारितोषिकगणेश आगमन व विसर्जनावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांची शिस्त वाखण्यासारखी असते. विसर्जन मिरवणूक अगदी शिस्तबद्ध काढली जाते. त्याची दखल घेऊन पोलीस विभागाने मंडळाचा दोनवेळा पारितोषिक देऊन गौरव केला आहे.या संस्थांचाही हातभार!कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ सामाजिक कामातच पुढे नाही, तर कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन व कोल्हापूर बालकल्याण संस्थेच्या माध्यमातून मोठे भरीव काम उभे केले आहे.अशी आहे कार्यकारणी-गणेश सन्नकी (अध्यक्ष), शिवाजी यादव (उपाध्यक्ष), धमेंद्र नष्टे (सचिव), संजय खोत, राजेश आवटे, सतीश खोत (सदस्य). 

गेल्या ३७ वर्षांची विधायक कामांची परंपरा आम्ही आजही जोपासली आहे. आगामी काळातही वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.-गणेश सन्नकी (अध्यक्ष, धान्य व्यापारी मंडळ)