शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

३७ कारखान्यांनी एफआरपी तटवली

By admin | Updated: April 27, 2016 00:55 IST

१३ खासगी कारखाने : ८० टक्क्यांप्रमाणेही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी; दुष्काळाबरोबच आर्थिक झळ

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आहे, पण मुळात ८० टक्क्यांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडलेले नाहीत. एफआरपी न देणाऱ्या राज्यातील ३७ सहकारी व खासगी कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा काढल्याने कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूर विभागातील अकरा कारखान्यांचा समावेश आहे. शेतकरी संघटना व राज्य सरकार यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार यंदाच्या गळीत हंगामातील एफआरपीचा तिढा सुटला होता. पहिल्या टप्प्यात गाळपास आलेल्या उसाच्या बिलापोटी एकूण एफआरपीमधील ८० टक्के रक्कम, तर हंगाम संपण्यापूर्वी उर्वरित २० टक्के रक्कम देण्यावर एकमत झाले होते. काही कारखान्यांनी पहिल्या टप्पातील एफआरपी मुदतीत दिली आहे; परंतु राज्यातील ३७ कारखान्यांनी एफआरपी तटविली आहे. त्यामध्ये १३ खासगी तर २४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सर्वाधिक उसाचा पट्टा असणाऱ्या कोल्हापूर व पुणे विभागातील सहकारी कारखान्यांनीच एफआरपीची रक्कम थकवली आहे. दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात उसाचे पैसे मिळाले नाही, तर तो आणखीन अडचणीत येणार असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साखरेचे दर वाढल्याने साखरेचे मूल्यांकनही वाढले असताना कारखाने पैसे देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी संघटनांचा रेट्यामुळे सरकारही आक्रमक झाले आहे. त्यामुळ उर्वरित २० टक्के एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्तीची घोषणा सरकारने केली आह. एफआरपी थकविलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या असून, शुक्रवारी (दि. २९) कार्यकारी संचालकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.