इचलकरंजी : येथील विविध २७ ठिकाणी ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान लालनगर येथील ४४ वर्षीय महिला, गणेशनगर येथील ५० वर्षीय पुरुष, सांगली नाका ६५ वर्षीय व विकली मार्केटजवळील ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यशवंत कॉलनी ३, बंडगर मळा, गणेशनगर, खंजिरे मळा, विकली मार्केटजवळ, रिंग रोड, दाते मळा, इंदिरा हौसिंग सोसायटी येथील प्रत्येकी २, दत्तनगर, शेळके गल्ली, आंबी गल्ली, वेताळ पेठ, भोनेमाळ, दातार मळा, पुजारी मळा, संत मळा, राधाकृष्ण टॉकीजजवळ, कलावंत गल्ली, सहकारनगर, सांगली नाका, पाटील मळा, मधुबन सोसायटी, हिरकणी हॉटेलसमोर, नाईक मळा, गोकुळ चौक, लालनगर व जवाहरनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार ३३४ जण बरे झाले आहेत. ४४४ जण उपचार घेत असून, २९२ वर मृत्यूसंख्या पोहोचली आहे.