कोल्हापूर : रंकाळा तलाव संवर्धनासाठीचा तयार केलेला ३६ कोटींचा प्रस्ताव परिपूर्ण द्यावा, यासंदर्भात नगरविकास विभागात तातडीने बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी अचानक रंकाळा तलावाची पाहणी केली.
महापालिकेकडून रंकाळा तलाव संवर्धनासाठी राज्य शासनाकडे ३६ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. यामधून रंकाळा तलाव येथील विविध कामे प्रस्तावित आहेत. गुरुवारी मंत्री शिंदे यांनी रंकाळा तलावाची पाहणी करताना या कामांची माहिती घेतली. रंकाळा तलावासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी शहर अभियंना नेत्रदीप सरनोबत यांनी कामांची माहिती दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाहणी
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. महापालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले. त्यांनी खासबाग मैदानाचीही आवर्जुन पाहणी केली.
फोटो : ०८०१२०२० कोल रंकाळा पाहणी
ओळी : कोल्हापुरातील रंकाळा तलावाची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.