शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

‘कामधेनू’ दत्तक ग्राम योजनेसाठी ३६ कोटींचा निधी

By admin | Updated: October 12, 2015 00:31 IST

दूधवाढीसाठी प्रयत्न : राज्यातील दोन हजार ४०२ गावांचा समावेश

प्रकाश पाटील-- कोपार्डे  जनावरांचे आरोग्य सुदृढ व्हावे, दूध उत्पन्न वाढावे, पशुपालकांची संख्या वाढून दर्जेदार उत्पादनासाठी दूध व पूरक उत्पादने वाढावीत यासाठी यंदाही जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामधेनू ग्रामदत्तक योजना राबवली जाणार आहे. चालू वर्षात राज्यातील दोन हजार ४०२ गावांची निवड केली असून, यासाठी ३६ कोटी ६० लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत गावच्या संख्येत घट झाली आहे. कामधेनू ग्रामदत्तक योजनेतून प्रत्येक गावाला एक लाख ५२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या गावांची निवड करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांचा समावेश असणार आहे. या योजनेतून जनावरांमध्ये वांझपणा येण्याची कारणे, वांझ तपासणी शिबिर, प्रतिबंधात्मक उपाययोजना , गोचीड प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था, पशुपालकांसाठी प्रबोधनात्मक सहल, चाऱ्यावर प्रक्रिया, चारा व्यवस्थापनासाठी हायड्रोफोनिक किंवा आझोला चाऱ्यांची निर्मिती करणे, मुरघास प्रकल्प राबविणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. प्रत्येक गावात पशुपालक मंडळ स्थापन करून त्यांची नोंदणी, सहलीसाठी सात हजार, जंतनाशक शिबिरासाठी १७ हजार ५००, खनिजद्रव्य मिश्रण व जीवनयुक्त पुरवठा ४० हजार, गोचीड, गोमाशी निर्मूलनासाठी १३ हजार, वंधत्व निदान व औषधोपचारासाठी २२ हजार, वैरण विकास कार्यक्रमासाठी १७ हजार रुपये, निकृष्ट चारा सकस करण्यासाठी पाच हजार, नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पाच हजार, मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत करणे प्रशिक्षणासाठी निधी असणार आहे. गावांच्या संख्येत घट यापूर्वीही जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ मध्ये कामधेनू दत्तक योजनेसाठी तीन हजार ३५१ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ५१ कोटी १० लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ९४९ गावे यावर्षी कामधेनू दत्तकग्राम योजनेतून कमी करण्यात आली आहेत.