शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्यासाठी ‘अन्नछत्र’सह ३५ टीम रायगडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:17 IST

अखिल भारतीय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर ३४६ वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारी अन्नछत्राची टीम दोन ट्रक भरून साहित्य घेऊन, तर रात्री समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली ३५ विविध समित्यांचे पदाधिकारी रवाना झाले.

ठळक मुद्दे‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळ्यासाठी ‘अन्नछत्र’सह ३५ टीम रायगडलाटप्प्याटप्प्याने शिवभक्त रवाना होणार

कोल्हापूर : अखिल भारतीय ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा समितीतर्फे ५ व ६ जूनला रायगडावर ३४६ वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारी अन्नछत्राची टीम दोन ट्रक भरून साहित्य घेऊन, तर रात्री समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली ३५ विविध समित्यांचे पदाधिकारी रवाना झाले.

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली व युवराज्ञी संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. सोहळ्यासाठी २५०० मावळ्यांच्या विविध समित्या स्थापन केल्या असून, प्रत्येकावर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.सोमवारी सायंकाळी भवानी मंडप येथून संयोगिताराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नछत्राचे साहित्य असलेले दोन ट्रक घेऊन ३०० स्वयंसेवक रवाना झाले. त्याचबरोबर रात्री अकराच्या सुमारास विविध ४० समित्यांचे पदाधिकारी पुढील तयारीसाठी रायगडकडे रवाना झाले. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व पदाधिकाऱ्यांकडून मंगळवारी पाचाड येथील मैदानावर जाऊन पाण्याच्या व्यवस्थेबाबत पाहणी करणार आहेत.

सायंकाळी गडावर जाऊन येथील तयारीची पाहणी केली जाणार आहे. गडावर पाण्याची व्यवस्था करून टाक्या बसविण्यात आल्या आहेत. स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मुख्य सोहळ्यासाठी मंडप उभारण्यात आले आहे. राज्यासह देशभरातून येणाऱ्या शिवभक्तांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.५ जूनला गडपूजन व ६ जूनला मुख्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी साडेतीन हजारांपेक्षा अधिक वाहनांसाठी टोल फ्रीच्या स्टीकरचे वाटप झाले आहे. नोंदणी झाली आहे. अजूनही नोंदणीचा ओघ वाढत असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. शिवभक्त मंगळवारी रवाना होणारविविध समित्यांचे पदाधिकारी सोहळ्याच्या तयारीसाठी सोमवारी रायगडावर रवाना झाले. तर मंगळवारी रात्री दहानंतर शिवभक्त रवाना होणार आहेत. समितीतर्फे दसरा चौकातून ५० आसनी १५ आरामबसची व्यवस्था केली आहे, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खासगी चारचाकी वाहनांमधूनही शिवभक्त रवाना होणार आहेत.

रायगड परिसरात आठ चौक्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच सोहळा समितीतर्फे आठ चौक्या उभ्या केल्या आहेत. यापैकी चार गडावर, तर चार गडाच्या पायथ्याशी व परिसरात असणार आहेत. प्रत्येक चौकीत दोन स्वयंसेवक, एक डॉक्टर, एक आपत्ती निवारण पथकाचा जवान, पार्किंग व्यवस्थेसाठी एक स्वयंसेवक, अशी रचना करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Raigadरायगडkolhapurकोल्हापूर