शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कोल्हापूर विभागात बाललैंगिक अत्याचाराचे ३३२ गुन्हे : ‘पॉक्सो’चा आलेख चढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:05 IST

अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात बलात्काराचे ३३२ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

ठळक मुद्देवीटभट्टी, ऊसतोड मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये अत्याचाराच्या घटना अधिककायद्याबाबत सजगता वाढविणे आवश्यक

एकनाथ पाटील।कोल्हापूर : अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात बलात्काराचे ३३२ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

बारा वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो) बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. या कायद्यामुळे लहान मुलांचे आयुष्य सुरक्षित राहणार आहे.

जम्मू-काश्मीर येथील कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने देश हादरून गेला; म्हणून १२ वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस मृत्युदंड देण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी जारी केला होता. बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना सुन्न करणाºया ठरत असल्याने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी ‘पॉक्सो’ कायद्यामध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात बदल करून नराधमांना फाशीची कठोर शिक्षा देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या किती घटना घडल्या, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी पुढे आली. वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तीन ते चौदा वर्षांपर्यंतच्या ३३२ बालिकांवरही खाऊचे आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याच्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पुणे ग्रामीणपाठोपाठ सोलापूर ग्रामीणमध्ये अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे. या गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होत होती; तर काही आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटत होते; परंतु पॉक्सो कायद्यात बदल होऊन बालकांवर अत्याचार केल्यास थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार असल्याने अशा विकृतीच्या नराधमांना चांगलाच चाप लागेल. 

या कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. आजपर्यंत अनेकदा कायदे होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. तसे होऊ नये यासाठी या कायद्याबाबत सजगता वाढविणे आवश्यक आहे, तरच त्याचा प्रभावी अंमल होऊ शकेल.- अतुल देसाई, बालहक्कचळवळीतील कार्यकत्कायदे करून अत्याचार थांबणार नाहीत. त्यांची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. पॉक्सो कायद्यातील नव्या बदलामुळे अशा घटनांना चाप बसेल.- अ‍ॅड. शिवाजी राणे, ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूरलहान मुलांवर अत्याचार करणाºयाला मृत्युदंड ठोठावण्याचा घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापुढच्या काळात तरी लहान, शाळकरी मुलामुलींचे बाल्य हे सुरक्षित राहील, असा विश्वास वाटतो. या अतिशय आवश्यक असणाºया कायद्यामुळे नवी पिढी अत्याचारापासून अधिक सुरक्षित असेल.- डॉ. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ साहित्यिक, बालशिक्षण तर्ज्ज्ञो