शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत, सहकार विभागाची मान्यता

By राजाराम लोंढे | Updated: June 12, 2023 15:45 IST

गेल्या चाैदा वर्षांत भरती झाली नाही. मात्र, तब्बल ९०० हून अधिक कर्मचारी कमी झाले. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवर कमालीचा ताण

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त झालेले ३३० कर्मचारी पुन्हा सेवेत घेण्यास सहकार विभागाने परवानगी दिली आहे. व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, निरीक्षकसह इतर पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लिपिक व शिपाई पदावर काम करावे लागणार आहे. यामध्ये १३० शिपाई तर २०० लिपिक म्हणून घेतले जाणार आहेत.

जिल्हा बँकेमध्ये २००९ ला भरती झाली होती. त्यानंतर गेल्या चाैदा वर्षांत भरती झाली नाही. मात्र, तब्बल ९०० हून अधिक कर्मचारी कमी झाले. त्यामुळे बँकेच्या यंत्रणेवर कमालीचा ताण जाणवत आहे. सध्या बँकेच्या १९१ शाखा असून व्यवसाय १३ हजार कोटी इतका आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले आणि व्यवसाय तीन पटीने वाढला. त्यामुळे अनेक शाखांत कर्मचारीच नाहीत. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या असून काही कर्मचाऱ्यांना आजारी असताना कामावर यावे लागत आहे.ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि भरती करता येत नसल्याने संचालक मंडळाने बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बँकेने सहकार विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला मान्यता मिळाल्याने ३३० सेवानिवृत्त कर्मचारी बँकेच्या सेवेत पुन्हा येणार आहेत. संचालक मंडळात मंजुरी घेऊन कर्मचाऱ्यांना हजर करून घेतले जाणार आहे.लिपिकाला २० हजार पगारलिपिकाला २० हजार रूपये तर शिपाई पदावर काम करणाऱ्यांना १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.२० महिन्यांचा करार?

वित्तीय संस्थेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्यावर जबाबदारी देणे जोखमीचे असते. या कर्मचाऱ्यांसोबत २० महिन्यांचा करार केला जाणार असून त्यांच्याकडून सुरक्षितता म्हणून किमान ५ लाख रूपये ठेव घेण्याबाबत विचार सुरू आहे.सेवानिवृत्त ४५० कर्मचाऱ्यांचे अर्जदोन महिन्यांपूर्वीच पुन्हा काम करण्यास तयार असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. तब्बल ४५० कर्मचाऱ्यांचे अर्ज बँकेकडे आले आहेत.

‘भरती’चा पुणे पॅटर्न

पुणे जिल्हा बँकेने दोन वर्षांच्या मुदतीने सेवानिवृत्त कर्मचारी घेतले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे रीतसर प्रस्ताव पाठवून मंजुरी घेऊन भरती केली होती. हा ‘पुणे पॅटर्न’ कोल्हापूर जिल्हा बँक राबवणार आहे.

ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेण्याबाबत प्रस्तावित आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. - डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक).

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक