शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ३३ अनधिकृत केबिन हटविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:50 IST

कोल्हापूर : सलग सुट्यांमुळे गेले आठवडाभर थांबलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी पुन्हा राबविण्यात आली. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोहीम राबवून सुमारे ३३ केबिन, १६ साईन बोर्ड, ११ शेड व १० ठिकाणच्या छपºया काढल्या. दरम्यान, रंकाळा स्टँड चौकातील दोन केबिन हटविण्यास शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विरोध दर्शविला. कारवाई केल्यास उद्रेकास सामोरे जावे लागेल, ...

कोल्हापूर : सलग सुट्यांमुळे गेले आठवडाभर थांबलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम मंगळवारी पुन्हा राबविण्यात आली. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोहीम राबवून सुमारे ३३ केबिन, १६ साईन बोर्ड, ११ शेड व १० ठिकाणच्या छपºया काढल्या. दरम्यान, रंकाळा स्टँड चौकातील दोन केबिन हटविण्यास शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विरोध दर्शविला. कारवाई केल्यास उद्रेकास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला, अधिकारी निष्प्रभ ठरले. अखेर पोलीस बंदोबस्त नसल्याने दोन दिवसांची मुदत देत अतिक्रमण निर्मूलन पथकास माघारी फिरावे लागले.मंगळवारी सकाळी ही मोहीम शिवाजी चौकातून सुरू झाली. शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपाची कमान, जोतिबा रोडचा काही भाग आणि बिंदू चौक सबजेलमार्गे कारवाई बिंदू चौकाच्या दिशेने गेली.त्यावेळी जोतिबा रोडवर फूलविक्रेत्यांची शेड्स हटविताना काही महिला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या आडव्या आल्या; त्यामुळे काहीवेळ वादावादी झाली. त्यानंतर ही मोहीम गंगावेश, शाहू उद्यान परिसरात राबविली.त्यानंतर पाडळकर मार्केटमार्गे रंकाळा स्टँड चौक परिसरात ही मोहीम आली असता तेथे दोन केबिन हटविण्यावरून वादाला तोंड फुटले. या परिसरातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख धनाजी दळवी यांनी केबिन हटविण्यास विरोध दर्शविला. बळाचा वापर करून केबिन हटविल्यास प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा यावेळी पथकास दिला.प्रथम आयुक्तांशी चर्चा घडवा, मगच केबिन हटवारंकाळा स्टँड चौकातील मोबाईल शॉपी आणि घड्याळ विक्री ही दोन केबिन हटविताना त्याला धनाजी दळवी व काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. गेल्या आठवड्यात आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी अधिकाºयांनी आयुक्तांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा आधार घेत दळवी यांनी प्रथम फेरीवाले झोनबाबत आयुक्तांशी चर्चा घडवा, मगच केबिन हटवा अशी भूमिका घेतली. तणावजन्य परिस्थितीत चारही उपअभियंत्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून घटनास्थळाची वस्तुस्थिती मांडली. त्यावेळी पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे ही कारवाई थांबविली; तसेच केबिन दोन दिवसांत काढून घ्याव्यात, असे दळवी यांना बजावून पथके माघारी फिरली.बांगड्यांचा आहेरआणि संतप्त कर्मचारीगेल्या महिन्यात काही वेळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या गटाने महापालिकेच्या प्रशासनाला बांगड्यांचा आहेर भेट दिला. त्याचाही आधार घेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी मोहीम थांबल्याने संतापून चर्चा करीत होते.