शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

३३ टक्केच झाडांचे संवर्धन -: दहा हजार वृक्षारोपणाची गणतीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:14 IST

सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार

ठळक मुद्दे इचलकरंजीतील नगरपालिकेचे चित्र

राजाराम पाटील ।इचलकरंजी : सरकारच्या विविध योजनांतून १ कोटी २८ लाख रुपये खर्च करून नगरपालिकेने गतवर्षी केलेल्या वृक्षारोपणापैकी ३३ टक्केच वृक्ष शिल्लक राहिले आहेत. पालिकेने लावलेल्या दहा हजार वृक्षांपैकी किती झाडे जगली, याची नोंदच नाही. असा अजब कारभार असलेल्या पालिकेला यंदाही आणखी ३० हजार ५०० वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शासनाने राज्यात शतकोटी वृक्षांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. वृक्षारोपणासाठी शहरी व ग्रामीण असे दोन गट आहेत. पैकी शहरी गटासाठी हरित शहर योजनेंतर्गत वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी नगरपालिकेला थेट अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानासाठी नगरपालिकेने निविदा काढून वृक्षारोपण व संवर्धन करावे, असा शासनाचा हेतू आहे.इचलकरंजी नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या १ कोटी २८ लाख रुपयांमध्ये पालिकेने दोन वेगवेगळ्या निविदा काढल्या. एका निविदेमध्ये नगरपालिकेने दिलेल्या जागा आणि ठरावीक रस्त्याकडेला वृक्षांचे रोपण करायचे आणि त्यांचे एक वर्ष संगोपन करण्याची जबाबदारी निविदाधारकाला देण्यात आली होती. दोन निविदांपैकी एक निविदा सांगली येथील एका मक्तेदाराला देण्यात आली. या मक्तेदाराने १ कोटी रुपयांमध्ये सात ते आठ फूट उंचीचे १४ हजार वृक्ष लावून त्याचे पुढे एक वर्ष संगोपन करावयाचे होते.

या मक्तेदाराने वृक्ष लावले. मात्र, नंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे १४ हजार वृक्षांपैकी ५ हजार ५०० वृक्ष जगल्याचे निदर्शनास आले. म्हणजे उद्दिष्टाच्या ३९ टक्के वृक्षसंवर्धन झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या मक्तेदाराला ३९ लाख रुपयेच देण्यात आले. वृक्षारोपण व संवर्धनासाठी आणखीन एक २८ लाख रुपयांची निविदा पुणे येथील कंपनीलादेण्यात आली. या मक्तेदाराने सात ते आठ फूट उंचीचे पाच हजार वृक्ष लावून त्यांचे एक वर्षापर्यंत संगोपन करणे अपेक्षित होते. मात्र, या मक्तेदाराने वृक्षारोपण केल्यानंतर  २१ लाख रुपये पेमेंट उचलले आणि तो गायब झाला. त्याने लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष शिल्लक आहेत, हे पाहण्याकरिता पालिकेने त्या वृक्षांची गणती केली. फक्त १४०० वृक्ष शिल्लक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करून उर्वरित रक्कम पालिकेने दिलीच नाही.

अशा प्रकारे दोन्ही मक्तेदारांच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीने नगरपालिकेला मात्र फटका बसला आहे. उद्दिष्टाच्या फक्त ३३.५ टक्के इतक्याच वृक्षांचे संगोपन झाल्याचे स्पष्ट झाले, तर गतवर्षी नगरपालिकेनेही दहा हजार वृक्ष लावण्याचे ठरविले होते. त्यासाठी नगरपालिकेने विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यक्ती यांच्या मागणीप्रमाणे वृक्षांची रोपे दिली. तसेच पालिकेच्या यंत्रणेमार्फतही शहरात वृक्ष लावण्यात आले. मात्र, या वृक्षांचे पुढे काय झाले, याची कोणत्याही प्रकारची नोंद नगरपालिकेकडे नाही, अशी माहिती उजेडात आली आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट द्यावेनगरपालिकेकडे १२०० अधिकारी व कर्मचारी आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यास शासकीय यंत्रणेने सांगितले तर पाच वर्षांत बारा हजार वृक्षांचे संगोपन होईल आणि हे उदाहरण राज्यातील अन्य नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी आदर्शवत ठरेल. म्हणून पालिकेतील अधिकारी व कर्मचाºयांना किमान दोन वृक्षांचे संवर्धन करण्याची सक्ती करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. 

आणखीन आॅक्सिजन पार्कच्या उभारणीची अपेक्षाआॅक्सिजन पार्क म्हणून नगरपालिकेने शहीद भगतसिंग उद्यानालगत असलेल्या साडेपाच एकरांमध्ये ५ हजार ५०० वृक्ष आणि शहापूरमधील सावली सोसायटीजवळ अडीच एकर जागेत 

२ हजार ८०० वृक्ष लावले.गतवर्षी लावलेल्या या वृक्षांचे संगोपन नगरपालिकेनेच केले असून शंभर टक्के वृक्ष जगले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने त्यांच्याच आरक्षित जागेमध्ये वृक्षांचे रोपण व संवर्धन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना