शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

३१८ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

By admin | Updated: January 3, 2016 00:54 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत डिसेंबरअखेर ६८ टक्केनिधी खर्च : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ओटीएसपीच्या ३१८ कोटी ८१ लाखांच्या प्रस्तावित आराखड्याला शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यंदा जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना आणि ओ.टी.एस.पी.साठी ३२१ कोटी ७६ लाखांच्या मंजूर नियतव्ययापैकी २१८ कोटी ३९ लाखांचा निधी वितरित केला असून, डिसेंबरअखेर १४९ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. उर्वरित निधी येत्या मार्चअखेर सर्व कार्यान्वित यंत्रणांनी करावा, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी येथे दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्यासह समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि ‘ओटीएसपी’च्या ३१८ कोटी ८१ लाखांच्या प्रस्तावित आराखड्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २१६ कोटी १९ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०० कोटी ८१ लाख आणि ‘ओटीएसपी’साठी १ कोटी ८१ लाखांच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय ९३ कोटी ६० लाखांची प्रस्तावित अतिरिक्त तरतुदीच्या प्रस्तावासही यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये कृषी विभागाकडील सूक्ष्मसिंचन योजना, पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार व बळकटीकरण, वनसंरक्षण व संवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, ग्रामपंचायतींचे स्मशानशेड बांधकाम, लघुसिंचन, अपारंपरिक उर्जा विकास कार्यक्रम, उद्योजकता प्रशिक्षण व बीज भांडवल, रस्ते आणि साकव विकास, यात्रा स्थळांचा विकास, प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती कार्यक्रम, आय. टी. आय.साठी यंत्रसामुग्री व आधुनिकीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विस्तार व बळकटीकरण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रम, नगरोत्थान महाअभियान, अंगणवाड्या बांधकाम आणि नावीन्यपूर्ण योजनेसाठीही विशेष तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री पाटील म्हणाले, चालू आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत देण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग त्या त्या योजनांवर वेळेतच करावा. डिसेंबरअखेर ६८.२४ टक्के इतका निधी खर्च करण्यात आला आहे. यंदाच्या नावीन्यपूर्ण योजनेसाठी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे व्हेंटिलेटरसाठी २३ लाख ४४ हजार, अंगणवाडीसाठी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे, कुपोषित आकलन प्रणालीसह मशीन खरेदीसाठी ४० लाख ४२ हजार, भूमी अभिलेख कार्यालयासाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन खरेदीसाठी ३० लाख आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई माध्यमिक, शैक्षणिक गुणवत्ता अभियानासाठी ५ लाखांच्या तरतुदीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)