शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी १००० टन ई-कचरा कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:17 IST

महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु

ठळक मुद्दे १०० टनांचाच पुनर्वापर; ई-कचरा जातो ओढ्या-नाल्यांत

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात रोज जमा होणारा ओला आणि सुका कचरा एका जागेत साठवून त्याचे निराकरण केले जाते. तसेच बांधकाम क्षेत्रातील कचरा, रुग्णालयांचा जैव-वैद्यकीय कचरा, औद्योगिक आणि रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित कचºयाच्या विल्हेवाटीची यंत्रणा असली तरी आरोग्याला घातक असलेल्या दरवर्षी साठणा-या हजारो टन ई-कचºयाच्या विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा मात्र कोल्हापुरात नाही. हा कचरा चक्क नाला-ओढ्यांत टाकला जात असल्यामुळे कॅन्सरसह गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे.

आरोग्याला घातक असल्यामुळे ई-कचरा इतर कचºयाबरोबर टाकायचा नसतो किंवा जमिनीत गाडायचाही नसतो; परंतु अनेकांना हे माहीतच नसल्यामुळे हा कचरा शहरात इतस्तत: विखुरलेला दिसतो. त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकांकडेही वेगळी यंत्रणा नाही. महानगरपालिकेकडे १३ प्रभागांतून घंटागाडीद्वारे रोज सुमारे १८० टन कचरा जमा होतो. त्यात ८० टन कचरा सुका असतो. मात्र, ई-कचरा केवळ ५० किलो जमा होतो. तो ग्रीन एनर्जी या खासगी कंपनीकडे सुपूर्द केला जातो. शहरातील अनेक रद्दीवाले आणि स्कॅ्रपवाल्यांकडे मिळून वर्षाला १००० टन ई-कचरा जमा होतो; परंतु त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट होत नाही. विशेषत: लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नरजवळील एका जागेत शहरातील सर्वाधिक ई-कचरा एकत्रित केला जातो, असा हजारो टन इ-कचरा साठून आहे.

ई-कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्रमाण टीव्ही, मोबाईलचेइलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून खराब झाली की त्यांचा ई-कचरा होतो. यामध्ये प्रामुख्याने टी.व्ही. संच, मोबाईल, संगणक, प्रिंटर, मॉनिटर, सीडी, चार्जर व सर्व प्रकारच्या बॅटºया यांचा समावेश मोठा आहे. अशा प्रकारच्या जमा होणा-या कच-यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे टी.व्ही. आणि मोबाईलचे आहे.

किलोमागे जास्तीत जास्त पैसे मिळत असल्यामुळे आणि या कचऱ्याबाबत जनजागृती नसल्यामुळे अनेक नागरिक पैसे घेऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतात; कारण हा कचरा हे स्क्रॅपवाले त्यातील धातू काढून घेऊन घातकपणे नष्ट करतात आणि त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.- मनोज मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महालक्ष्मी ई-सायकलर्स प्रा. लि.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर