शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची दानत..मुलींसाठी उभारले पावणेतीन कोटींचे वसतीगृह 

By विश्वास पाटील | Updated: December 20, 2023 14:03 IST

प्रा. तिलोत्तमा नेवगी महिला वसतीगृह नामकरण सोहळा शनिवारी

कोल्हापूर : समाजाच्या हिताचे काम होत असेल तर कोल्हापूरचा माणूस त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो याचा अनुभव पुन्हा एकदा बालकल्याण संकुलला आला आहे.. बालकल्याण संकुल च्या वतीने लोकाश्रयातून दोन कोटी 80 लाख रुपयांचा निधी उभारून मुलींची वस्तीगृह बांधण्यात आले आहे .या ताराराणी चौकातील महिला वसतीगृहाचे प्रा. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी असे नामकरण व उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. २३) सकाळी १० वाजता होत आहे. रेणूका शुगर्सच्या संस्थापक अध्यक्ष विद्या मुरकुंबी, जिल्हाधिकारी  राहूल रेखावार  व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी, कैलाश नेवगी व सर्व कुटुंबीय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. या वसतिगृहात ४८ महिलांची राहण्याची उत्तम सोय केली आहे.कोल्हापुरातील प्रसिध्द विधिज्ञ अँड. अभय नेवगी यांचे संस्थेशी बरीच वर्ष ऋणानुबंध आहेत. संस्थेच्या मदतीच्या हाकेला ते कायम धावून आले आहेत. संस्थेच्या कोणत्याही न्यायालयीन कामात एक नया पैसाही न घेता ते कित्येक वर्षे मदत करत आले आहेत. संस्थेला या इमारतीसाठी निधीची अडचण असल्याचे समजल्यावर त्यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला आणि ५० लाख रुपयांचा निधी संस्थेकडे सुपूर्द केला. त्यांच्या या मदतीचे ऋण म्हणून संस्थेने या वसतिगृहाला ॲड नेवगी यांच्या मातोश्री प्रा. तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी यांचे नांव देण्याचा निर्णय घेतला. वसतिगृहाला योग्य व्यक्तीचे नाव दिल्याचा संस्थेला मनस्वी आनंद होत आहे.संस्थेने या जागेवर महिला वसतीगृह बांधण्याचा निर्णय २०१८ ला घेतला. तत्कालीन जिल्हाधिकारी व संस्थाध्यक्ष दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाने विश्वस्त  व्ही. बी. पाटील, वास्तुविशारद निरंजन वायचळ  सुरेश शिपूरकर व सर्व विश्वस्त यांच्या मदतीने सचिव पद्मजा तिवले आणि सहसचिव एस.एन. पाटील यांनी प्लॅन मंजुरी व इतर सोपस्कार यशस्वी केले. कोल्हापूरात १९३७ साली स्थापन झालेल्या मूळ अनाथ महिला आश्रमाचे विलीनीकरण १९९१ साली बालकल्याण संकुल या संस्थेत झाले. या महिलाश्रमाची सुमारे १० हजार चौरस फूट जागा संस्थेकडे आली. या जागेवरील असणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी संस्थेने उच्च न्यायालयापर्यंत लढाई केली.

यांचे योगदान मोलाचे..संस्था उभारण्याचा संकल्प झाल्याबरोबर संस्थेबद्दल आस्था असणाऱ्या श्री ब्रीहद भारतीय समाज मुंबई, लक्ष्मी सिव्हिल इंजि.प्रा.लि कोल्हापूर, मा. टी.डी.कुलकर्णी, डॉ. सुभाष आठले, संस्थेचे उपाध्यक्ष मा.सुरेश शिपूरकर, कॅप्टन उत्तम पाटील, अध्यक्ष शेतकरी सहकारी संघ, ह्युमन इक्विटी अँड डीग्निटी फंडचे शिरीष बेरी,  कन्स्ट्रक्शनचे सहसचिव एस.एन.पाटील, सचिन भानुशाली कोल्हापूर यांच्याकडून भरीव अर्थसहाय्य प्राप्त झाले.

लोकाश्रयातून देखणी वास्तू..युनिक ऑटोचे चोरडिया समूहाने इमारत बांधणीसाठी बिनव्याजी डिपॉझिट देऊन बांधकामात सहकार्य केले. अशा विविध दानशूर व्यक्तींकडून भरीव अर्थसहाय्य प्राप्त झाल्यामुळेच २ कोटी ८० लाखाची ही अत्यंत देखणी वास्तू कोणत्याही शासकीय मदतीशिवाय उभी राहू शकली याचा संस्थेला नक्कीच अभिमान वाटतो.

उत्तम सोयी-सुविधा..हे नवीन वसतीगृह व्यवसाय, नोकरी करणाऱ्या एकल महिलांच्या निवासासाठी बांधले असून प्रसंगी गरजू व उच्च शिक्षण घेणाऱ्या बालकल्याण संकुलच्या निराधार विद्यार्थीनीनांही तेथे राहता येईल. या वसतीगृहात ४८ महिलांची राहण्याची उत्तम सोय असून येथे सोलर वॉटर हिटर योजना, पुरेशी वीज, पाणी आणि उत्तम फर्निचर इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्या महिलांना स्वत:च्या कुटुंबात राहतोय असे वाटावे इतक्या चांगल्या सोयी तिथे दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर