शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘चेंबर आॅफ कॉमर्स’ंसाठी २८ जण रिंगणात

By admin | Updated: December 28, 2016 00:11 IST

तीन जागा बिनविरोध : दिलीप मोहिते, ललित गांधी, महेश धर्माधिकारी यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या त्रैवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात तीन गटांतील २० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात १७ विद्यमान संचालकांचा समावेश आहे. सह व मानद सभासद गटापाठोपाठ कॉर्पोरेट सभासद गटातील बिनविरोध निवडीमध्ये सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली. अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर मंगळवारी हे चित्र स्पष्ट झाले. ‘चेंबर’साठी आता सत्ताधारी विरोधात व्यापार, उद्योजक परिवर्तन क्रांती आघाडी यांच्यात लढत होणार आहे.या संस्थेच्या कार्यकारिणी मंडळातील २३ जागांच्या निवडीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाली. यासाठी ५८ जणांचे अर्ज पात्र ठरले. मंगळवार हा अर्ज माघारीच्या मुदतीमधील शेवटचा दिवस होता. यावेळी एकूण २५ जणांनी माघार घेतली. कॉर्पोरेट सभासद गटातील दोन जागांसाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यातील रेश्मा पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने विद्यमान संचालक दिलीप मोहिते व ललित गांधी यांची बिनविरोध निवड झाली. संलग्न सभासद गटातील पाच जागांसाठी आठ अर्ज दाखल झाले होते. यातील कमलेश कात्रे, सुरेश गायकवाड यांनी माघार घेतली. साधारण सभासदांपैकी औद्योगिक संस्था गटामधील पाच जागांसाठी १४ दाखल केले होते. यातील राजीव परीख, रघुनाथ थोरात, रमेश लालवाणी, सुनील काळे, संभाजीराव पोवार, डी. डी. पाटील, प्रकाश मालाडकर, सागर लाड यांनी माघार घेतली. व्यापारी संस्था गटातील १० जागांसाठी ३० जणांकडून अर्ज दाखल झाले होते. यामधील विनोद डुणुंग, सीमा शहा, हितेंद्र पटेल, राजेंद्र शेटे, नितीन धूत, संजीव चिपळूणकर, अजित होनोले, सुजित चव्हाण, विनोद पटेल, अरुण हत्ती, उदयसिंह निंबाळकर, अतुल शहा, लक्ष्मणप्रसाद चौधरी, सुधीर खराडे यांनी अर्ज मागे घेतले. चिन्ह वाटपाची प्रक्रिया आज, बुधवारी सायंकाळी होईल. यानंतर दि. ४ जानेवारीला मतदान होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. दीपक देसाई यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यापासून अर्ज माघारीच्या अखेरच्या मुदतीपर्यंत ती बिनविरोध करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, काही उमेदवार लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर निवडणूक लागली आहे. (प्रतिनिधी)रिंगणातील उमेदवार...संलग्न सभासद गट : आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, संजय शेटे, धनंजय दुग्गे (विद्यमान संचालक), प्रकाश पुणेकर. औद्योगिक संस्था गट : विजय मेनन, सुरेंद्र जैन, दिनेश बुधले (विद्यमान संचालक), योगेश कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, सुरेश भिवटे. व्यापारी संस्था गट : जयेश ओसवाल, दीपक मिरजे, भरत ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रकाश केसरकर, शिवराज जगदाळे, नयन प्रसादे, हरिभाई पटेल, संजयकुमार पाटील (विद्यमान संचालक), बाहुबली पाटील, गिरीश कर्नावट, जयंतकुमार गोयाणी, पारस ओसवाल, राहुल नष्टे, मनोहर ढवळे, संदीप अथणे.