शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मलईदार पदासाठी बदलीपात्र सर्कल, तलाठ्यांची मोर्चेबांधणी; शासन आदेशानंतर बदली प्रक्रिया सुरू 

By भीमगोंड देसाई | Updated: June 17, 2024 14:18 IST

२५७ जणांच्या बदल्या होणार, लोकप्रतिनिधींकडून वशिला

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : लोकसभा आचारसंहितेमुळे रखडलेल्या महसूल विभागातील पात्र असलेल्या २५७ जणांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये सर्कल, तलाठी शहरालगतच्या मलईदार पदावरच आपली बदली होण्यासाठी तर अव्वल कारकून, महसूल सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी, तहसील कार्यालयातील जमीन शाखा, आरटीएसमधील ( जमिनीसंबंधीच्या तक्रारी, दावे) क्रिम टेबल मिळण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणूक लागणार असल्याने लोकप्रतिनिधीही आपल्याला हवा कर्मचारी हव्या त्या ठिकाणी राहण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील आहेत. यामुळे बदल्यांनाही विशेष ‘भाव’ आला आहे.प्रत्येक वर्षी महसूलमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के बदल्या केल्या जातात. एका पदावर तीन वर्षे आणि एका विभागात सहा वर्षे काम केलेले कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. प्रत्येक वर्षी ३१ मे पूर्वी बदलीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पण यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या रेंगाळल्या. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे. यामुळे जिल्हा महसूलमधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर बदलीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दरम्यान, बदलीपात्र कर्मचारी आपल्याला सोयीचे ठिकाण मिळावे, मलईदार पदावर वर्णी लागवी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच शहरालगत जमिनीच्या खरेदी, विक्री, बँक बोजा चढवणे, कमी करणे, एनए करणे, वर्ग बदलण्याची कामे अधिक होत असल्याने आणि याच कामातून मनसोक्त डल्ला मारता येत असल्याने अशा महसूल सज्जाला सर्वाधिक मागणी आहे. अशा मलईदार ठिकाणचे पद मिळण्यासाठी सर्कल, तलाठ्यांची रस्सीखेच सुरू आहे. काही जण तर थेट आमदार, खासदारांकरवी प्रयत्न करीत आहेत. परिणामी, यंदाच्या बदलीच्या प्रक्रियेसंबंधी कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

तलाठ्यांची पहिल्यांदाच जिल्ह्यात बदली होणार असल्याने..पूर्वी तलाठ्यांच्या बदल्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच होत होत्या. आता पहिल्यांदाच जिल्ह्यात कोणत्याही सज्जावर बदली होणार आहे. यामुळे वशिलेबाजी, हप्तेखोरीमुळे लॉबिंग करून मलईदार परिसरातील सज्जावरच वर्षोनुवर्षे काम करणाऱ्यांनाही जिल्ह्यात इतर सज्जावर जावे लागणार आहे. त्यांंच्या महसूलमधील मक्तेदारीला सुरूंग लागणार आहे.

कोटींचा बंगलावाला तलाठ्याची बदली कोठे ?प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच बदली झाल्याने चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील मलईदार सज्जावर तलाठी म्हणून काम केलेल्या कोटींचा बंगलावाला तलाठी गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील तो तलाठी लॉबिंग करून प्रत्येक बदलीच्या प्रक्रियेत सर्वाधिक मलई असलेल्या ठिकाणीच वर्णी लावून घेतो. यंदा जिल्ह्यात कोठेही बदली होणार असल्याने त्या कोटींच्या बंगलेवाल्या तलाठ्याची कोठे बदली होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.

राजकीय पुढाऱ्यांची काही सर्कल, तलाठ्यांशी संगनमतशेतकऱ्यासह विविध घटकाचा थेट संबंध तलाठी, सर्कलशी येतो. म्हणून आपल्या विरोधात जाणारा, आपल्यापेक्षा वरचढ ठरू पाहणाऱ्यांची हेलपाटे मारून जिरवण्यासाठी राजकीय पुढारी काही सर्कल, तलाठ्यांचा खांद्यावर बंदूक ठेवतात. म्हणून राजकीय पुढाऱ्यांचे संगनमत तलाठी, सर्कलशी असते, हे जगजाहीर आहे.

संवर्गनिहाय बदलीपात्र कर्मचारी असे :

  • तलाठी : १२०
  • सर्कल : २३
  • अव्वल कारकून : ४७
  • महसूल सहायक : ६७
टॅग्स :kolhapurकोल्हापूरTransferबदली