शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

वसंतदादा साखर कारखान्यास २४ कोटींचे कर्ज

By admin | Updated: April 17, 2016 00:42 IST

जिल्हा बॅँक : तत्त्वत: मान्यता, ४२ कोटी रुपयांची केली होती मागणी

सांगली : आर्थिक वर्ष संपताना जिल्हा बँकेच्या थकबाकीचे ६२ कोटी रुपये भरणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २४ कोटी रुपयांच्या कर्जास शनिवारी जिल्हा बँक कार्यकारी समितीच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. कारखान्याने एकूण ४२ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती, मात्र समितीने अंशत: कर्जास मान्यता दर्शविली आहे. जिल्हा बँकेने २0१५-१६ या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद नुकताच पूर्ण केला. बँकेला एकूण ८२ कोटींचा ढोबळ नफा झाल्याने बँकेचा राज्यात गवगवा झाला. नफ्याचा हा आकडा वाढण्यामागे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची थकबाकी वसुली कारणीभूत ठरली. कारखान्याने ३१ मार्च रोजी ६२ कोटी रुपये भरले होते. थकबाकीदारांच्या यादीत वसंतदादा कारखानाच अव्वल होता. त्यामुळे कारखान्याकडील वसुली हे सर्वात मोठे उद्दीष्ट घेऊन बँक प्रशासन काम करीत होते. त्यामुळे सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारखान्यास जप्तीची नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर ३१ मार्च रोजी कारखान्याने ६२ कोटीची संपूर्ण थकबाकी भरल्याने बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. कर्ज भरतेवेळी जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी कारखाना अध्यक्ष विशाल पाटील यांना पुन्हा कर्ज मिळविण्यासाठी कारखाना पात्र झाल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखान्याकडून पुन्हा कर्जाचा प्रस्ताव सादर होणार, याची दाट शक्यता दिसत होती. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच कारखान्याने पुन्हा ४२ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव जिल्हा बँकेकडे सादर केला. जिल्हा बँकेच्या शनिवारी झालेल्या कार्यकारी समितीसमोर हा प्रस्ताव चर्चेला आला. बँकेने पूर्ण कर्ज मंजूर केल्यास आर्थिक फिरवाफिरवीची चर्चा होण्याची शक्यता गृहीत धरून कार्यकारी समितीने २४ कोटी रुपये अंशत: कर्ज मंजूरीस तत्त्वत: मान्यता दिली आहे. कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्यास १0 कोटीचे अल्पमुदत कर्जही यावेळी मंजूर केले. थकबाकीची पूर्ण रक्कम कारखान्याने भरल्यामुळे पुन्हा कर्ज घेण्यासाठी ते पात्र ठरलेले आहेत. तरीही पैसे भरल्यानंतर १५ दिवसात कर्जाचा प्रस्ताव सादर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)