शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा

By संदीप आडनाईक | Updated: April 29, 2023 19:50 IST

यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज, दि. ३० एप्रिल (रविवारी) सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत कोल्हापूर शहरातील ७१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २३ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली. परीक्षार्थींना केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता बोलावण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक (श्रेणी १), मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक, टंकलेखक, आदी एकूण ८१६९ पदांसाठी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ ही परीक्षा राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर होत आहे. लिपिक टंकलेखक संवर्गातील सर्वाधिक ७०३४ पदांसाठी राज्यभरातून विद्यार्थी बसलेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ७१ केंद्रांसाठी इचलकरंजी, पेठवडगाव, वारणानगर, कागल, निगवे यांसारख्या ठिकाणांवरील विविध शाळा या परीक्षांसाठी प्रशासनाने घेतल्या आहेत. यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून, त्यामुळे परीक्षाकेंद्रांची संख्याही प्रशासनाने वाढविली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय १८ समन्वय अधिकारी आणि तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा