शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

चारू चांदणेविरोधात २२ परिस्थितिजन्य भक्कम पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 19:01 IST

कोल्हापूर : देवकर पाणंद-शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात परिस्थितिजन्य असे २२ भक्कम पुरावे सिद्ध झाले आहेत. चांदणे याने दर्शनचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून करून, त्याला तेथीलच जवळ असणाºया विहिरीत फेकून दिले, असा युक्तिवाद सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ...

ठळक मुद्देदर्शन शहा खून प्रकरण : बुधवारी सुनावणी

कोल्हापूर : देवकर पाणंद-शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी योगेश उर्फ चारू चांदणे याच्याविरोधात परिस्थितिजन्य असे २२ भक्कम पुरावे सिद्ध झाले आहेत. चांदणे याने दर्शनचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून करून, त्याला तेथीलच जवळ असणाºया विहिरीत फेकून दिले, असा युक्तिवाद सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केला. मंगळवारी येथील जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ अ‍ॅड. निकम यांनी युक्तिवाद केला. याची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे.

दर्शन शहा या शाळकरी मुलाचा २५ डिसेंबर २०१२ रोजी खून झाला. या प्रकरणी संशयित योगेश उर्फ चारू चांदणे याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. या खून खटल्याची सुनावणी एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी सकाळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी, दर्शन शहाचा निर्घृणपणे चांदणेने खून केला आहे. या खटल्यात एकूण ३० साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये २२ परिस्थितिजन्य पुराव्यांची साखळी सिद्ध झाली आहे. चांदणेला पैशांची चणचण होती. त्याने माजी नगरसेवक महेश गायकवाड व सागर कटके यांच्याकडून पैसे घेतले होते. त्याने पैसे परत केले नाहीत. पैशांसाठी दर्शन शहाच्या खुनापूर्वी धनत्रयोदशीदिवशी नोव्हेंबर २०१२ मध्ये स्मिता शहा (दर्शनची आई) यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या हाती काही लागले नाही. गायकवाडचे एक लाख रुपयांतील ७० हजार, तर कटकेचे ५८ हजार रुपये चांदणे देणे लागत होता.

खून झाल्यादिवशी २५ डिसेंबर २०१२ रोजी सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आदित्य डावरे व सागर चौगले या दोघा साक्षीदारांनी जाताना, तर निखिल मोहिते याने रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास चांदणेला धावत येताना पाहिले होते. दुसºया दिवशी दर्शन शहाचा मृतदेह तेथील विहिरीत मिळून आला. दरम्यान, तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी ३ जानेवारी २०१३ रोजी घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना विहिरीपासून सुमारे ५० फूट अंतरावर दर्शनचे चप्पल त्यांना सापडले. तसेच दर्शनच्या शवविच्छेदन अहवालात सीपीआर रुग्णालयाचे डॉक्टर अविनाश वाघमारे यांनी दर्शनचा खून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून झाला, असे म्हटले आहे. त्यानुसार केडगे यांनी चारू चांदणेकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त केली.

सुनंदा कुलकर्णी यांना २६ डिसेंबर २०१२ रोजी स्मिता शहा यांच्या घराजवळ चिठ्ठी निदर्शनास आली. त्यांनी ती स्मिता शहा यांना दिली. त्या चिठ्ठीमध्ये ‘२५ तोळे सोने दिले नाही, तर दर्शन शहाचे तुकडे करू,’असा मजकूर लिहिला होता. ही चिठ्ठी चारू चांदणेनेच लिहिली असल्याचा तपासात उलगडा झाला, असा युक्तिवाद करून अ‍ॅड. निकम यांनी, स्मिता शहा यांनी २५ डिसेंबर २०१२ रोजी जुना राजवाडा पोलिसांत दर्शन बेपत्ता असल्याची तक्रार रात्री ११ वाजता दिली होती. त्याचबरोबर दर्शनच्या शहाच्या कपड्याचे बटण १८ जानेवारी २०१३ रोजी घटनास्थळावरून केडगे यांनी जप्त केले. तसेच हे बटण दर्शनच्या शर्टला तंतोतंत जुळत असल्याचा निर्वाळा हस्ताक्षरतज्ज्ञ जयसिंग लाडगे यांनी दिला, असा युक्तिवाद केला. सुनावणीवेळी आरोपीचे वकील अ‍ॅड. पीटर बारदेस्कर, तपास अधिकारी यशवंत केडगे उपस्थित होते.

अ‍ॅड. निकम यांनी मांडलेले मुद्दे

* दर्शन गायब असल्याची स्मिता शहा यांनी २५ जानेवारी २०१२ रोजी पोलिसांत दिलेली तक्रार* पैशाच्या चणचणीमुळे चारू चांदणे याने दोघांकडून उसने घेतलेले पैसे* साक्षीदारांनी चांदणे याला पाहिलेल्या साक्षी* चांदणेनेच चिठ्ठीतील मजकूर लिहिल्याचा तपासात उलगडा* दर्शनचे घटनास्थळावरून सापडलेले शर्टचे बटण.