शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सर्किट बेंचसाठी २२ एकर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:23 IST

कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील २२ एकर ५०० गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा प्रशसनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला.सर्किट बेंचसाठी प्रस्तावित जागेच्या वस्तुस्थितीबाबत २३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.यावेळी शेंडा पार्क येथील जागेशी संबंधित १३ विविध सरकारी कार्यालयांचा अभिप्राय ...

कोल्हापूर : सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क येथील २२ एकर ५०० गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा प्रशसनाकडून पुणे विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला.सर्किट बेंचसाठी प्रस्तावित जागेच्या वस्तुस्थितीबाबत २३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती.यावेळी शेंडा पार्क येथील जागेशी संबंधित १३ विविध सरकारी कार्यालयांचा अभिप्राय मागवून त्यांचा परिपूर्ण अहवाल पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना ३० जुलैपर्यंत देण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल यांना दिले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, नगररचना विभाग, कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाने आपला अभिप्राय न दिल्याने हा अहवाल अडकला होता. तो नुकताच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.त्यानंतर शेंडा पार्क येथे २२ एकर ५०० गुंठे जागा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंगळवारी विभागीय आयुक्तांना पाठविला. यामुळे सर्किट बेंचच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.जागा उपलब्ध झाली असली तरी मूळ सर्किट बेंचच्या मंजुरीची प्रक्रिया मात्र ठप्प आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रुजू झाल्यानंतर त्याना राज्य शासनाकडून नव्याने फक्त कोल्हापूरचाच प्रस्ताव देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु पूर्णवेळ न्यायाधीशच अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे शासनाकडूनही नवीन प्रस्ताव सादर झालेला नाही. या प्रश्नाला गती देण्यासाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने दिला आहे.