शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात तपासणीविना धावताहेत २०० स्कूल बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:59 IST

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येथे चर्चेत आला आहे.

कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर स्कूल बसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येथे चर्चेत आला आहे. प्रथम दंडात्मक, जप्ती आणि न्यायालयीन कारवाई अशा कारवाईच्या बडग्यानंतरही शहरासह जिल्ह्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २०० बसेस अवैधरित्या तपासणीविना फिरत आहेत. या बसेसवर कडक कारवाई करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली आहे.कोल्हापूर -सांगली राज्यमार्गावर चोकाक येथे मंगळवारी कंटेनर आणि स्कुलबसची धडक होवून ३ जण ठार तर २४ जण जखमी झाले होते. घोडावत इंटरनॅशनल स्कूल बसला झालेल्या या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने बेकायदा विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू करुन दिवसभरात १२ बसेसवर कारवाई केली. यातील दोन जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई चालूच राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. टी. अल्वारीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.विद्यार्थिनीसह दोघांची प्रकृती चिंताजनकदरम्यान मंगळवारच्या अपघातातील १५ जखमी विद्यार्थ्यांना उपचार करून बुधवारी घरी पाठविण्यात आले. नऊ जखमींवर उपचार सुरू असून, लविना चूघ ही विद्यार्थिनी आणि बसमधील अटेंडन्स हृषीकेश कांबळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हातकणंगले पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाकडून या अपघाताची चौकशी सुरू आहे. कंटेनरमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले की चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला, याबाबतचा अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाकडून पोलिसांना प्राप्त होणार आहे.मंगळवारच्या अपघातानंतर वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरुध्द मोहीम सुरू करून मंगळवार-बुधवार या दोन दिवसांत एका कॉन्स्टेबलसह ४४० वाहनचालकांवर कारवाई करून ८९ हजार ७०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली.