शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कर्नाटकात उसाला प्रतिटन २०० रुपये

By admin | Updated: July 2, 2015 00:23 IST

राज्याला ९०० कोटी रूपयांचे कर्ज मिळेल, पण यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारांनी कर्ज घेतले असल्या कारणाने ते परत कर्ज घेण्याच्या तयारीत नाहीत.

बेळगाव : वर्ष २०१३-१४ या आर्थिक वर्षातील ऊस उत्पादकांची थकीत बिले अदा करण्यासाठी कर्नाटक सरकारने प्रतिटन उसाला २०० रूपये देण्याची घोषणा मंगळवारी (दि.३० जून) विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली. या रकमेतील १०० रुपये १० जुलैपूर्वी व उर्वरित १०० रुपये ३१ जुलैपूर्वी दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या व सहकारमंत्री महादेव प्रसाद यांनी केली.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत थकीत ऊस बिलाप्रश्नी घमासान चर्चा झाली. विरोधी पक्षांनी १० जुलैपूर्वीच सर्व थकीत बिले अदा करण्याची आग्रही मागणी धरत सभात्याग केला. याच प्रश्नावर सायंकाळी मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवेदन दिले. ते म्हणाले, २०१३-१४च्या ९२३ कोटींच्या थकबाकीसाठी उसाला प्रतिटन २०० रुपये चालू महिन्यातच दिले जाईल. २०१४-१५ साठी एफआरपीनुसार दर घोषित करण्यात आला असून, ८० टक्के बिल अदा करण्यात आली आहेत. उर्वरित २० टक्के बिलाची रक्कम ही दोन हजार १२० कोटी असून, या बिलासंबंधी अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली आहे. राज्याला ९०० कोटी रूपयांचे कर्ज मिळेल, पण यापूर्वी राज्यातील साखर कारखानदारांनी कर्ज घेतले असल्या कारणाने ते परत कर्ज घेण्याच्या तयारीत नाहीत. या बिलाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. (प्रतिनिधी)