गावाशेजारी असणाऱ्या गायरानमधून वणव्याला सकाळी ११ च्या सुमारास सुरुवात झाली. वारे व उन्हाच्या तडाख्यामुळे क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. दोन तासानंतर आग आटोक्यात आली. आगीमध्ये अशोक धोंडीबा होडगे यांची काजूची १७० झाडे, सुरेश मारुती होडगे यांची काजूची ३० झाडे होरपळली, तर विलास दत्तू पडते व यशवंत धोंडीबा पडते यांच्या गवताच्या २० हजार पेंड्या जळून खाक झाल्या. उत्पादनास तयार झालेली काजूची झाडे जळाल्यामुळे होडगे यांचे ४० हजारांचे नुकसान झाले, तर पडते यांचे गवत जळाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------------------
* फोटो ओळी :
यमेकोंड (ता. आजरा) येथे लागलेली आग. दुसऱ्या छायाचित्रात वणव्यात जळालेली गवतगंजी.
क्रमांक : ०५०४२०२१-गड-०२