शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

महापालिकेचे २० कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: September 29, 2015 00:48 IST

शासनाचा निर्णय : सार्वजनिक बांधकामतर्फे कामे होणार; निधीवरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच झाली होती खडाजंगी

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वीच मंजूर केलेले २० कोटी रुपये सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तसा शासनादेशही नगरविकास विभागाने काढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने हा निधी दिल्याने त्यावरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली होती. हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महापालिकांना मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येते. त्यानुसार राज्यातील कोल्हापूर या एकमेव महापालिकेस हा निधी मंजूर झाला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच हा निधी मंजूर झाला. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी हे २० कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले होते. त्यावरून शिवसेनेही नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकाच आमदारास विकासकामासाठी वेगळा निधी कसा काय देतात, असे शिवसेनेचे म्हणणे होते. तोपर्यंत या निधीतून कोणती कामे करायची, याचे नियोजन शासकीय विश्रामधामवर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन राडा केला व अधिकाऱ्यांना पळवून लावले होते. इतका वादग्रस्त ठरलेला निधी नेमका ज्यादिवशी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली त्याचदिवशी वितरित झाला आहे.नगरसचिव विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी काढलेल्या शासन आदेशात त्यासंबंधी असे म्हटले आहे की, ‘या प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा शासनाचाच असेल. त्यामुळे २० कोटी रुपयांच्या मर्यादेत सक्षम प्राधिकाऱ्याची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करून घ्यावी.या निधीसाठी कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग राहील. या निधीतून दुरुस्तीची कामे करता येणार नाहीत. या प्रकल्पांतंर्गत जी कामे होतील त्याचे त्रयस्थ यंत्रणेकडून लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असेल. हा निधी ३१ मार्च २०१७ पर्यंत खर्च करावयाचा आहे. निधीचे वितरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा निधी कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करता येणार नाही. त्यामुळे या निधीतून राज्य शासनाची कोणतेही येणे रक्कम कपात करून घेता येणार नाही. या निधीतून जी विकासकामे करण्यात येणार आहेत त्यातून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही म्हटले आहे.पहिल्यांदा असे घडले...नगरविकास विभागाकडून शहर विकासासाठी दिला जाणारा निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महापालिकेकडे देण्याची आजपर्यंतची प्रथा होती; परंतु आता पहिल्यांदाच महापालिकेला बायपास करून हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे. पालकमंत्री हेच सार्वजनिक बांधकाममंत्री आहेत. हव्या त्या कंत्राटदाराला काम देणे सोपे व्हावे यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.