लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवीन १८१२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार ३३९, श्रावणबाळ ११६७, इंदिरा गांधी वृद्धापकाळ २४९ व इंदिरा गांधी विधवा योजनेत ५७ जणांचा समावेश आहे. महाविकास आघाडी कोरोना काळातही दररोज ५०० लाभार्थ्यांना अनुदान वाटप करत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे म्हणाले.
खंजिरे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर कोरोना काळातही अनेक प्रलंबित प्रकरणे मंजूर केली. प्रत्येक महिन्याला इचलकरंजी विधानसभा मतदारघांतील लाभार्थ्यांना खंजिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण केंद्र व वेदभवन येथे कुपन वाटप केले जाते. त्यामुळे बँकेतील गर्दी कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी अप्पर तहसीलदार शरद पाटील, योजनेचे सचिव अमित डोंगरे, सदस्या सरिता आवळे, नागेश शेजाळे, हारुण खलिफा, सचिन कांबळे, सूरज लाड, राजन मुठाणे आदी उपस्थित होते.