शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी थकविणारे १८ कारखाने रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:29 IST

कोल्हापूर : वारंवार नोटिसा पाठवून, मुदतवाढ देऊनही साखर कारखानदार जुमानत नसल्याने अखेर साखर आयुक्तांनी निवडणूक संपल्यावर लागलीच कारवाईचा धडाका ...

कोल्हापूर : वारंवार नोटिसा पाठवून, मुदतवाढ देऊनही साखर कारखानदार जुमानत नसल्याने अखेर साखर आयुक्तांनी निवडणूक संपल्यावर लागलीच कारवाईचा धडाका सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना आरआरसीअंतर्गत साखर जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, नोटिसा तयार ठेवल्या आहेत.जिल्ह्यातील २२ पैकी १८ कारखाने या कारवाईअंतर्गत आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतून विश्रांती मिळत नाही तोवर साखरजप्तीच्या कारवाईची कुºहाड कोसळणार असल्याने साखर उद्योग हबकला आहे.ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तुटल्याच्या आत १०० टक्के एफआरपी देय असतानाही साखरेला दर व मागणी नसल्यामुळे पैसा नसल्याचे सांगत साखर कारखानदारांनी ८० : २० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे बिले अदा केली आहेत. प्रत्येक कारखान्याकडून अजून प्रतिटन किमान ५०० रुपये थकीत आहेत. ही एफआरपी अदा करावी याबाबत पुणे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पदभार घेतल्यापासून सातत्याने कारखानदारांना लेखी सूचना दिल्या आहेत; पण जिल्ह्यातील चार कारखान्यांचा अपवाद वगळता याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नाही.३० मार्चपर्यंत थकित एफआरपी द्या, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्याचेही पालन झाले नाही. दरम्यान, या कालावधीत लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि निवडणूक कामात यंत्रणा अडकल्याने कारवाईच्या बाबतीतील निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. बुधवारी (दि. २४) आचारसंहिता शिथिल झाल्यावर लगेच आयुक्तांकडून थकीत एफआरपीचा अहवाल मागवून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.१०० टक्के एफआरपी दिलेले कारखानेसरसेनापती संताजी घोरपडे (सेनापती कापशी), हेमरस शुगर्स (राजगोळी) या दोन कारखान्यांनी अनुक्रमे १८४ कोटी ७९ लाख व १९० कोटींची १०० टक्के एफआरपी उत्पादकांना सर्वांतप्रथम अदा केली आहे.डी. वाय. पाटील (गगनबावडा), दूधगंगा (बिद्री) या दोन कारखान्यांनी अनुक्रमे १५ कोटी२४ लाख व ३० कोटी ८१ लाखांची रक्कम मागील आठवड्यात खात्यावर जमा केली आहे.कारखाना दिलेली शिल्लकआजरा ७२ १५.४६भोगावती ८८.५० २५.८१राजाराम ११२.७८ ०४.३९शाहू १९८ ३३.००दत्त ३०७.२४ ३७.४३बिद्री १८६.१९ ——गडहिंग्लज ६६.१४ १०.८२जवाहर ४२१.२४ ९१.१४मंडलिक ११२.५८ २३.०७कुंभी ११९.७३ ३९.४३पंचगंगा १४०.३९ ६५.४१कारखाना दिलेली शिल्लकशरद १५७.९६ १८.९३वारणा ११२.४२ १४९.२२गायकवाड ५७.७१ १०.४३डी. वाय. ८७.१२ ——दालमिया २२५.६१ ४२.३५गुरुदत्त १६१.६६ ६२.०२इको केन ४५.७४ ०९.९७हेमरस १९०.०० ——महाडिक ४८.७१ १०.७०घोरपडे १८४.७९ ——तांबाळे ५७.८९ ५.३५