शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांची चंगळ! कारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

By उद्धव गोडसे | Updated: January 23, 2024 12:12 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना अर्धवट भाजलेल्या चपात्या, पाणीदार आमटी आणि बेचव भात खाऊन दिवस काढावे ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या गुन्हेगारांना अर्धवट भाजलेल्या चपात्या, पाणीदार आमटी आणि बेचव भात खाऊन दिवस काढावे लागत असतील, असा तुमचा समज असेल तर जरा थांबा. आपण घरात खातो त्याहीपेक्षा जास्त आहार कैद्यांना शासकीय खर्चातून मिळतो. शिवाय कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, मिठाई यासह १६७ वस्तू उपलब्ध असतात. अमली पदार्थ वगळता इतर बहुतांश वस्तू कैद्यांना स्वखर्चातून मिळतात, त्यामुळे शिक्षेदरम्यानही कैद्यांची चंगळ असते.केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कैद्याला पश्चाताप व्हावा, यासाठी पूर्वी अनेक प्रकारच्या यातना दिल्या जायच्या. शारीरिक कष्ट करून घेऊन त्याला पुरेसे खायला दिले जात नव्हते. याशिवाय मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कैद्यांसाठी कारागृहातील जगणे कठीण ठरत होते. मात्र, कालांतराने कैद्यांनाही त्यांचे अधिकार मिळायला हवेत, या मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत. यामुळे कारागृहातील कैद्यांचे जगणे सुसह्य ठरत आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे २१०० कैदी शिक्षा भोगतात. त्यांना रोज सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान चहा दिला जातो. आठ वाजता नाष्टा. यात कांदापोहे, उपमा, शिरा यापैकी एक पदार्थ आणि दूध दिले जाते. सकाळी दहा वाजता जेवणाची वेळ होते. यात तीन चपात्या, भाजी, वरण, भात आणि केळी असे असते. दुपारी तीनला चहा मिळतो. सायंकाळी पाच वाजता जेवण दिले जाते. हे जेवण कैदी त्यांच्या सोयीने कधीही खाऊ शकतात. आठवड्यातून एकदा खीर, अंडी किंवा सणासुदीला गोड पदार्थांची मेजवानी असते. हा सर्व आहार शासकीय खर्चातून मिळतो.

स्वखर्चातून बरेच काही उपलब्धकारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, सुका मेवा, फरसाण, चिवडा, शेंगदाणे, चिरमुरे, चिक्की, चॉकलेट्स, मिठाई असे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. हे पदार्थ कैद्यांना स्वखर्चातून घ्यावे लागतात. यासाठी त्यांना दरमहा नातेवाइकांकडून मनीऑर्डर स्वीकारता येते. तसेच कारागृहात केलेल्या कामाचा मेहनताना मिळतो. यातून ते खाद्य पदार्थांचा खर्च भागवतात.

असे असते दिवसभरातील आहाराचे प्रमाण

  • सहा चपात्या - ४०० ते ६०० ग्रॅम पिठाच्या
  • भाजी - २५० ग्रॅम
  • वरण किंवा डाळ - ९० ग्रॅम
  • दूध - २५० ग्रॅम
  • चहा - दोन कप

राज्यात ६० कारागृहे

  • मध्यवर्ती कारागृहे - ९
  • जिल्हा कारागृहे - ३१
  • खुले कारागृह - १९
  • महिला कारागृह - १

करमणूक आणि शिक्षणाचीही सोयकैद्यांच्या करमणुकीसाठी कारागृहात खेळाची साधने उपलब्ध असतात. मोकळ्या वेळेत कैदी खेळ खेळून मनोरंजन करतात. याशिवाय कारागृहातून शिक्षणही घेता येते. त्यासाठी शिक्षक आणि वाचनालयाची सोय असते.

कुटुंबापासून दूर राहणे हीच मोठी शिक्षाकारागृहात सुविधा असल्या तरी शिक्षा ती शिक्षाच असते. कुटुंबापासून दूर राहावे लागते. कारागृहातील अन्य कैद्यांच्या संगतीत मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. चार भिंतींच्या आतील वातावरणात मनाचा कोंडमारा होतो. यामुळे त्या वाटेला न जाणे हेच चांगले.

कारागृह हे सुधारगृह आहे. कैद्यांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते. शासकीय नियमानुसार कैद्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातात. - पांडुरंग भुसारे - प्रभारी अधीक्षक, कळंबा कारागृह 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrisonतुरुंग