निपाणी प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. गावात राजकीय खलबते सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. निपाणी तालुक्यात २७ ग्रामपंचायती असून, यासाठी १ लाख ५२ हजार ७७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२७ ग्रामपंचायतींसाठी १८० मतदान केंद्र बनविण्यात येणार आहेत. तालुक्यात पुरुष मतदार ७८ हजार २७९, तर महिला मतदार ७४ हजार ४८३ आहेत.
निपाणी तालुक्यातील मतदान दुसऱ्या टप्प्यात होणार असून, ११ ते १६ पर्यंत अर्ज दाखल करणे, १९ रोजी माघार घेणे अशी मुदत देण्यात अली आहे. निपाणी तालुक्यातील पंचायतींसाठी २७ रोजी मतदान होणार असून, ३० रोजी निकाल लागणार आहे.