शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पंधरा रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड ‘आरोग्य मित्र’ अडचणीत : सिटी, मोरया, संजीवनी, कृष्णा रुग्णालयांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:08 IST

महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर शहरासह जिहयातील एकूण १५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड झाले आहे. सर्व उपचार मोफत करण्याची अट असताना रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या चार रुग्णालयांना या योजनेतून काढून टाकण्यात आले

ठळक मुद्दे पंधरा रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड ‘आरोग्य मित्र’ अडचणीत : सिटी, मोरया, संजीवनी, कृष्णा रुग्णालयांचा समावेशया कारवाईमुळे चार ते पाच ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर शहरासह जिहयातील एकूण १५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघड झाले आहे. सर्व उपचार मोफत करण्याची अट असताना रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या चार रुग्णालयांना या योजनेतून काढून टाकण्यात आले असून, उर्वरित ११ रुग्णालयांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. योजनेच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई आणि दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाºयांच्या १० पथकांनी शुक्रवारी (दि. १२) कोल्हापूर जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट ३४ रुग्णालयांवर छापे टाकले होते. त्यातील अनेक रुग्णालयांमध्ये २२रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणे, औषधाचे पैसे घेणे, इतर खर्च दाखवून त्यांचे बिल आकारणे यासारखे प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानंतर शनिवारीही हे छापा टाकण्याचे काम सुरू होते. या छाप्यात काही रुग्णालयांमधील संगणक आणि कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती. रविवारी दिवसभरामध्ये या अधिकाºयांच्या पथकांनी ताब्यात घेतलेले संगणक आणि कागदपत्रांची छाननी केली असता एकूण१५ रुग्णालयांनी गैरकारभार केल्याचे उघडकीस झाले.चार रुग्णालयांना योजनेतून काढलेकोल्हापूर शहरातील तीन आणि इचलकरंजी येथील संजीवनी हॉस्पिटल या चार रुग्णालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने या चारही रुग्णालयांना यादीतून काढण्यात आले आहे. 

अजून पाच रुग्णालये रडारवरशुक्रवारपासून कोल्हापूर शहरासह२२ जिल्ह्यांत ही कारवाई सुरू असून, सोमवारीही डॉक्टरांची दोन पथके शहर कार्यरत होती. आणखी पाच रुग्णालये त्याच्या ‘रडार’वर आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी आणखी सखोलपणे करण्यात येत असून, त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.११ रुग्णालयांचे निलंबनशहर आणि जिल्ह्यातील ११ रुग्णालयांचे निलंबन केले आहे. या रुग्णालयांचे स्पष्टीकरण जर मान्य करण्याजोगे असेल तर ते मान्य करून पुन्हा या रुग्णालयांना यादीवर घेता येणार आहे. मात्र, समाधानकारक खुलासा न केल्यास यातील रुग्णालयांनाही यादीतून काढून टाकण्यात येणार आहे.‘आरोग्य मित्रां’वर होणार कारवाईरुग्णालयाबरोबर रुग्णांची कागदपत्रे घेणारे ‘आरोग्य मित्र’ या मोहिमेमुळे अडचणीत आले आहेत. या ‘आरोग्य मित्रां’ची चौकशी करण्यात आली असून, पथकाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. ३४ रुग्णालयांत ‘आरोग्य मित्र’ कार्यरत आहेत. या कारवाईमुळे चार ते पाच ‘आरोग्य मित्र’ अडचणीत आल्याचे सांगण्यात आले.रुग्ण हलविण्यास सुरुवातज्या रुग्णालयांना यादीतून काढण्यात आले आहे आणि निलंबित करण्यात आले आहे, अशा रुग्णालयांमधून रुग्णांना हलविण्यास सुरुवात झाली आहे. अपात्र रुग्णालयांमध्ये जर उपचार घेतले गेले तर ते ग्राह्य धरले जाणार नसल्याने रुग्ण दुसºया रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfraudधोकेबाजी